अहो सामनाचे संपादक; सावरकरांचा नव्हे तर शिवसेनेचा खुळखुळा झाला आहे

249

राहुल गांधी यांनी सावरकरांवर टीका केल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी “उद्धव ठाकरे राहुल गांधींचा निषेध करतील काय?” असा सवाल विचारला आणि तो ठाकरेंच्या जिव्हारी लागला. उद्धव ठाकरे हे राहुल गांधी यांचा निषेध करु शकत नाहीत कारण त्यांची राजकीय मजबूरी आहे. ठाकरे हळूहळू आता डाव्या लोकांच्या संगतीत येत आहेत. तुषार गांधी व कम्युनिस्टांना भेटून तर त्यांनी कमालच केली.

आता त्यांचा राजकीय अजेंडा काहीही असो, याच्याशी सावरकर प्रेमींना काही देणं घेणं नाही. त्यांना सावरकरांच्या नावावरून भाजपला कोंडीत पकडायचं असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. परंतु भाजपला कोंडित पकडताना सावरकरांसाठी आपण कोणत्या प्रकारची भाषा वापरतो, हे शिवसेनेच्या दैनिक सामनाला कळेनासे झाले आहे. दिनांक १२ ऑक्टोबर २०२२ रोजी प्रसिद्ध झालेल्या सामनाच्या अग्रलेखात देवेंद्र फडणवीसांवर टीका करता अशी ओळ आहे की, “कॉंग्रेसने वीर सावरकरांचा खुळखुळा केला आहे तर भारतीय जनता पक्षाने स्वातंत्र्यवीरांचे खेळणे केले आहे.”

( हेही वाचा: दिवाळीतही जांबोरी मैदान भाजपकडे: येत्या १९ ते २३ ऑक्टोबर मराठमोळ्या दीपोत्सवाचे आयोजन )

आता यांच्या भाषेला काय म्हणावे. तरी सामनाच्या अग्रलेखात थेट सावरकरांवर टीका केली गेली नाही, जरी त्यांचा तसा उद्देश नाही मानले तरी लिहिताना कोणत्या गोष्टीसाठी कोणते शब्द वापरायचे याचे काही भान असायला हवे की नको? बाळासाहेब ठाकरे हे पत्रकारितेच्या पार्श्वभूमीतून नेते झाले आहेत याचा तरी भान ठेवायला हवा. उचलली बोटे आणि आदळली की-बोर्डवर असे करुन गिरीश कुबेरांच्या पंक्तीत जाऊन बसण्याची किती ती घाई!

स्वा. सावरकर हे शब्दांचे प्रभू होते. आपण त्यांच्या विचारांचे आहोत असे म्हणताना किमान शब्दांचे भान नको का ठेवायला? काँग्रेस स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वीनाकारण, आपल्या नीच राजकाराणासाठी अपमान करते यामुळे सावरकरांचा खुळखुळा कसा होईल? आणि भाजप सावरकरांना भारतरत्न प्रदान करत नाही म्हणून त्यांचे खेळणे कसे होईल? सामनाचा अग्रलेख खरडणार्‍यांकडे या प्रश्नाचे उत्तर आहे का? संजय राऊत जेलमध्ये गेल्यामुळे कुणी अशिक्षित कंटेंट रायटर ठेवलाय का? उद्धव ठाकरे आपला दैनिक सामना वाचतात की नाही? त्यांना त्यात काहीच आक्षेपार्ह वाटत नाही का?

जर खुळखुळा आणि खेळणे या शब्दांचा योग्य जागी वापर करायचा म्हटला तर सामनाची किती पंचाईत होईल पाहा. बाळासाहेबांनी निर्माण केलेली शिवसेना आता कमकुवत झाली. बाळासाहेबांचे कट्टर शत्रू शरद पवांरांच्या नादी लागून शिवसेना संपवली असे म्हणण्यास वाव आहे.  मग सावरकर प्रेमींनी खुळखुळा आणि खेळणे या शब्दाचा वापर शिवसेनेसाठी करायचा म्हटला तर तो असा होईल की, “एकनाथ शिंदे यांनी उठाव करुन शिवसेनेचा खुळाखुळा केला आणि शरद पवारांच्या नादी लागून तिचे खेळणे झाले” असं जर सावरकर प्रेमींनी म्हटले तर वावगे ठरणार आहे का?

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.