शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांचा सांगलीमध्ये अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. संभाजी भिडे गुरुजी सायकलवरून पडले आहेत. सायकल चालवत असताना त्यांना अचानक चक्कर आला आणि त्यातून ते जमिनीवर पडले. या अपघातात ते गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. त्यांना सांगलीच्या भारती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. संभाजी भिडे यांच्यावर प्रेम करणारा महाराष्ट्रात मोठा चाहता वर्ग आहे. त्यांची बोलण्याची शैली अनेकांना भावते. त्यामुळे संभाजी भिडे यांच्या अपघाताची बातमी अनेकांसाठी धक्कादायक आहे.
कायम प्रसिद्धीच्या झोतात
संभाजी भिडे हे त्यांच्या रोखठोक वक्तव्यामुळेही प्रसिद्ध आहेत. ते त्यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. पण संभाजी भिडे यांनी अनेक वादग्रस्त विधान करून वाद ओढावून घेतला आहे. संभाजी भिडे नुकतेच एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. मिरजेत काल शिवतीर्थ परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा अनावरणाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी त्यांनी देशातील 123 कोटी नागरिकांचा रक्तगट हा छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचा असला पाहिजे, असे विधान केले होते. संभाजी भिडे यांच्याविषयी सविस्तर माहिती सांगायची झाली तर त्याचे मनोहर असे मूळ नाव आहे. ते सांगतील राहतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील एकेकाळचे प्रमुख कार्यकर्ते बाबाराव भिडे यांचे ते पुतणे आहेत. संभाजी भिडे हे देखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कार्यरत होते. पण संघातील काही जणांशी वाद झाल्यानंतर त्यांनी 1984 मध्ये श्री शिव प्रतिष्ठानची स्थापना केली होती. बाबरी मशीद आणि रामजन्मभूमी वाद उफाळला होता तेव्हा भिडे गुरुजींची संघटना राज्यभरात चर्चेत आली होती.
(हेही वाचा शरद पवारांना भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणी समन्स )
Join Our WhatsApp Community