राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात फेसबुकवर हिणकस मजकूर प्रसारित करणारी टिव्ही मालिकांमधील अभिनेत्री केतकी चितळे हिला सध्या तुरुंगाची वारी करायला लागत आहे. आता या प्रकरणावर भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी भाष्य केले आहे. तृप्ती देसाई यांनी केतकीचे समर्थन केले आहे. सोबतच या प्रकरणात सुप्रिया सुळेंनी घेतलेली भूमिका आणि पंकजा मुंडेची भूमिका यावर तृप्ती देसाई यांनी भाष्य केले आहे.
काय म्हणाल्या तृप्ती देसाई
भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई म्हणाल्या की, केतकी चितळेच्या वयाचा विचार करता या सर्व गोष्टी संपवायला हव्यात, पवार साहेब मोठे नेते आहेत असे म्हणणाऱ्या पंकजा मुंडे किती अभ्यासू आहेत ते कळतंय पण दुसरी बाजू पाहता शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे मात्र कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हे प्रकरण वाढवतानाच दिसत आहेत. सुप्रिया सुळे स्वतःहून अशी सामंजस्याची भूमिका घेतली असती, तर नक्कीच सर्वसामान्यांच्या मनात त्यांना अजून आदराचे स्थान वाढले असते. पंकजा मुंडे यांनी एक महिला म्हणून एका महिलेकडे बघण्याचा दृष्टिकोन जो दाखवला आहे, त्यामुळे त्यांच्याविषयी आमच्या मनात अजूनच आदर वाढला असल्याचे, तृप्ती देसाई म्हणाल्या.
( हेही वाचा: मनसैनिकांचा ‘चलो अयोध्या’चा नारा! १२ ट्रेन्स, १०० गाड्याभरून अयोध्येत जाणार, कसं आहे प्लॅनिंग? )
याआधीही केले होते समर्थन
केतकी चितळे प्रकरणी याआधीही तृप्ती देसाई यांनी केतकीप्रती समर्थन केले होते. केतकीच्या पोस्टमध्ये थेट नाव घेण्यात आलेले नाही, असे सांगताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवरही कारवाई करा अशी मागणी तृप्ती देसाई यांनी केली होती.
Join Our WhatsApp Community