अखेर संभाजी छत्रपती बसले आमरण उपोषणाला, कारण…

126

ठाकरे सरकारने मराठा समाजाच्या ६-७ मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन जून २०२१ मध्ये दिले होते, मात्र त्याचा पूर्तता करण्यात आली नाही. त्यामुळे अखेर भाजपाचे खासदार संभाजी छत्रपती यांनी आमरण उपोषणाची घोषणा केली आहे.

आश्वासनाकडे दुर्लक्ष

आपण गरीब मराठा समाजाच्या उद्धारासाठी प्रयत्म करत आहे. मराठा आरक्षणाचा विषय दीर्घकालीन आहे, त्यामुळे तोवर मराठा समाजाच्या अन्य मागण्यांची पूर्तता करण्यात यावी, त्यासाठी ‘सारथी’ या संस्थेला शक्ती पुरवा. कोल्हापूर आणि पूणे या ठिकाणच्या ‘सारथी’साठी १५० कोटीची तरतूद करण्यात यावी, १३ वसतीगृहे उभारण्यात याव्यात या मागण्यांसह काही मागण्यांसाठी कोल्हापूर, पूणे येथे आंदोलन केले होते, त्यावेळी सरकारने आश्वासन दिले होते, मात्र सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे आपण आमरण उपोषण करत आहे. ज्या घराण्यात आपण जन्माला आलो, हे पाहता आमरण उपोषण करणे जिकरीचे आहे, तरीही आपण हे आंदोलन करत आहे, असे खासदार संभाजी छत्रपती म्हणाले.

(हेही वाचा आत्महत्या आणि आत्मार्पण किंवा समाधी यात काय फरक आहे?)

2013ला आपण महाराष्ट्र पिंजत असताना मराठा समाजाच्या संघटना एकत्र आल्या. त्यांनी मला नेतृत्व करायला सांगितले. त्यानंतर 2013 रोजी आम्ही लाखोच्या संख्येने मोर्चा काढला. त्यानंतर राणे समिती आली आणि आरक्षण मिळाले. ते टिकले नाही. 2017 रोजी आझाद मैदानात मोर्चा निघाला. त्यावेळी स्टेजवर जाण्याची कुणाचं धाडस नव्हतं. हिंदू-मुस्लिम, दलित-मराठा, ओबीसी-मराठा वाद होण्याची शक्यता होती. इंटेलिन्स विभाग आणि समन्वयकांनी मला स्टेजवर जायला सांगितले. तुम्ही स्टेजवर गेला नाही तर गालबोट लागेल असे सांगितले. त्यामुळे मी स्टेजवर गेलो आणि दोन मिनिटात मनोगत मांडले. लोकांनी माझे म्हणणे ऐकले आणि लोके परत गेली, पण आता आपण गप्प बसणार नाही, असे संभाजी छत्रपती यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.