छत्रपती संभाजी राजे यांनी पत्रकार परिषद घेत राज्यसभेची निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ही मोठी घोषणा केली. जाणून घेऊयात छत्रपती संभाजी राजे यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे.
राज्यसभा निवडणूक लढवणार नाही
राज्यसभा निवडणूक लढवणार नाही, असे संभाजीराजे यांनी स्पष्ट केले. राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार होऊ नये, यासाठी मी हा निर्णय घेतल्याचे संभाजी राजे यांनी म्हटले आहे. मी राज्यसभा निवडणूक लढवणार नाही, ही माघार नाही हा माझा स्वाभिमान असल्याचे, संभाजीराजे म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला नाही
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे संजय पवार यांना उमेदवारी देण्याबाबत विचारणा केली, पण मुख्यमंत्र्यांनी माझा फोन घेतला नाही. ज्या शिवसेना आमदार आणि मंत्र्यांसोबत माझ्या बैठका झाल्या, त्यांच्याकडे या प्रश्नांचे उत्तर नव्हते, असेही संभाजीराजे यावेळी म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला नाही, असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
( हेही वाचा: शिवसेना, मनसेनंतर आता बच्चू कडूही करणार अयोध्या दौरा! )
शिवसेनेची ऑफर होती
अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानंतर, मला शिवसेनेकडून ऑफर आली होती. पण ऑफर मी नाकारली. शिवसेनेने मला पुरस्कृत अपक्ष उमेदवार म्हणून घोषित करावे, असा मी प्रस्ताव दिला होता. त्यावर चर्चा झाली बैठका झाल्या, पण अचानक संजय पवार यांना उमेदवारी देण्यात आली.
Join Our WhatsApp Community