Maratha Reservation : मराठा समाजाला कायदेशीर पातळीवर टिकणारे आरक्षण मिळावे – छत्रपती संभाजी राजे

मराठा समाजाला कायदेशीर पातळीवर टिकणारे आरक्षण देण्यासाठी पाऊले उचलण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.

154
Maratha Reservation : मराठा समाजाला कायदेशीर पातळीवर टिकणारे आरक्षण मिळावे - छत्रपती संभाजी राजे
Maratha Reservation : मराठा समाजाला कायदेशीर पातळीवर टिकणारे आरक्षण मिळावे - छत्रपती संभाजी राजे

राज्यसभेचे माजी खासदार छत्रपती संभाजी राजे (Chhatrapati Sambhaji Raje) यांनी मंगळवारी (२८ नोव्हेंबर) केंद्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर (Hansraj Ahir)  यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मराठा समाजाला (Maratha society) कायदेशीर पातळीवर टिकणारे आरक्षण देण्यासाठी पाऊले उचलण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. (Maratha Reservation)

दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनात पत्रकारांशी बोलताना छत्रपती संभाजी म्हणाले की, मराठा समाजाला दिले जाणारे आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकायला पाहिजे. यासाठी क्युरेटिव्ह पेटीशनमध्ये आवश्यक बदल करण्याची गरज आहे. याबाबत आपण महाराष्ट्र सरकारला वारंवार सांगितले आहे. (Maratha Reservation)

केंद्रीय मागासवर्ग आयोगाला (Central Commission for Backward Classes) घटनात्मक दर्जा प्राप्त आहे. यामुळे आयोगाने राज्य मागासवर्ग आयोगाला मार्गदर्शक सूचना द्याव्यात अशी मागणी देखील छत्रपती संभाजी यांनी केली. ते म्हणाले की, १९५० पर्यंत मराठा समाजाचा Intermediate Community मध्ये समावेश होता, यामुळे त्या वेळी मराठा समाजाला आरक्षण मिळत होते. मात्र एखाद्या राज्यात अपवादात्मक परिस्थिती सिद्ध करण्यासाठीचे निकष हे १९९२ सालचे आहे. १९९२ सालचे निकष हे आज लागू होणार नाही त्यामुळे हे निकष सद्य परिस्थिती नुसार बदलण्यात यावे अशी मागणी सुद्धा त्यांनी मंगळवारी केली. (Maratha Reservation)

(हेही वाचा – Marathi Sign Boards : कारवाई का करत नाही; राज ठाकरे यांचा राज्य सरकारला प्रश्न)

तेलंगणा आणि कर्नाटक राज्यात मराठा समाजाला (Maratha society) ओबीसीमध्ये आरक्षण (OBC Reservation) दिले जाते. आता तेलंगणा आणि कर्नाटक राज्य सरकारने तेथील मराठा समाजाला केंद्राच्या यादीत स्थान देण्याची मागणी केली असून तेथील मराठा समाजाला केंद्राच्या यादीत देखील स्थान मिळण्याची शक्यता आहे. तेलंगणा आणि कर्नाटक राज्यात मराठा समाजाला कायदेशीर टिकणारे आरक्षण मिळू शकत असेल तर महाराष्ट्रात का नाही? असा सवाल देखील संभाजीराजे यांनी उपस्थित केला. (Maratha Reservation)

मराठा समाज हा सामाजिक मागास आहे, मात्र मराठा समाजाचे सामाजिक व शैक्षणिक प्रतिनिधित्व तपासताना १००% पैकी किती? असा फॉर्म्युला वापरायला हवा होता, मात्र त्या ऐवजी ४८% खुल्या प्रवर्गातून मराठा किती? असे निकष लावल्यामुळे मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. केंद्रीय मागासवर्ग आयोगाने यात लक्ष घालुन हे निकष बदलण्यासाठी प्रयत्न करावेळ अशी मागणी संभाजीराजे यांनी केली. मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी राज्यभर संघर्ष करत आहेत. त्यांच्या प्रामाणिक संघर्षाला व गरीब मराठा समाजाला कायदेशीर बळ मिळण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. (Maratha Reservation)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.