राज्याचे हिवाळी अधिवेशन वादळी स्वरूपात झाल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. छत्रपती संभाजी राजे हे स्वराज्य रक्षक होते, धर्मवीर नव्हते, असे म्हटले. त्यावर आता माजी खासदार संभाजी राजे यांनी अजित पवार यांना चुकीचे ठरवले. छत्रपती संभाजी राजे हे स्वराज्य रक्षक होतेच, तसेच ते धर्मवीरही होते. तसे अनेक पुरावे अस्तित्वात आहेत, असे संभाजी राजे पत्रकार परिषदेत म्हणाले.
काय म्हणाले संभाजी राजे?
छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. संभाजी महाराज, राजाराम महाराज आणि ताराराणीसाहेब यांनी या हिंदवी स्वराज्याचे संरक्षण केले. त्याबद्दल दुमत नाही. संभाजी महाराज स्वराज्य रक्षक होते हे निश्चित आहे. तसेच संभाजी महाराजांनी धर्माचेही रक्षण केले, हे कोणीही नाकारू शकत नाही. म्हणून संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक तर आहेतच, त्यापाठोपाठ ते धर्मरक्षकही आहेत. हे म्हटले तर काही चुकीचे होणार नाही. त्यामुळे तुम्ही इतिहासाची मोडतोड करू नका, असे संभाजी छत्रपती यांनी सांगितले. अजित पवारांनी कोणता संदर्भ देऊन ते विधान केले, ते त्यांनीच सांगावे. कोणत्याही ऐतिहासिक घटनेवर भाष्य करताना त्यावर अभ्यास केल्याशिवाय प्रतिक्रिया देऊ नका, अशी माझी सर्व पुढाऱ्यांना विनंती राहील, असेही संभाजी राजे म्हणाले. सभागृहात बोललेल्या विधानाला अधिकृतपणा येतो. सभागृहाच्या बाहेर काहीही बोलले जाते, सभागृहात मात्र अभ्यास करूनच बोलावे लागते. मग कोणताही विषय असो, असेही संभाजी राजे ते म्हणाले.
(हेही वाचा #BOYCOTTSonyTV ट्रेंड सुरु; ‘सोनी’च्या ‘क्राईम पेट्रोल’मध्ये आफताब बनला हिंदू, श्रद्धा बनली ख्रिश्चन)
Join Our WhatsApp Community