स्वराज्य संघटना २०२४ साली होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढणारच असा निर्धार स्वराज्य संघटनेचे संस्थापक संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केला आहे. ‘स्व’ म्हणाजे तुम्ही. आपल्याला सामान्य माणसांचे, शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे ‘राज्य’ आणायचे आहे. त्यासाठी २०२४ मधील निवडणुकीच्या तयारीला लागा, असे म्हणत संभाजीराजे यांनी मोठी घोषणाच केली आहे. स्वराज्य संघटनेचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे शनिवारी झाले. याच अधिवेशनात राज्यातील पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना संभाजीराजे यांनी ही घोषणा केली.
संभाजीराजे म्हणाले की, ‘निवडून आल्यानंतर नेते आपला रंग दाखवितात. आता रेटून खोटे बोलले जात आहे. जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जाते. वेळप्रसंगी ही शिवाजी महाराज, शाहू महाराज आणि महासंताचं नाव घेत खुळ्यात कढाले जाते. आता पाच वर्षे वाट पाहण्याची गरज नाही. त्यामुळे आजही वेळ गेलेली नाही. स्वराज्यच्या माध्यमातून जनजागृती करत सामान्य शेतकऱ्यांना ताकदी करण्याचे काम करायचे.’
(हेही वाचा – Nitesh Rane : संजय राऊत म्हणजे मविआची गौतमी पाटील – नितेश राणे)
‘या स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून जनजागृती करू. सामान्य कष्टकरी, शेतकऱ्यांना ताकद देण्यासाठी आपल्याला बाहेर पडायचे आहे. २०२४ मधील निवडणुकींच्या तयारीला लागा. आपल्याकडे प्रस्थापित लोक नाहीत म्हणून घाबरण्याची गरज नाही. माझा विश्वास आहे, सुसंस्कृत नेता स्वराज्यात येणारच आहे. आपण फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुण घ्यायचे आहेत,’ असे संभाजीराजे म्हणाले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community