संभाजीराजेंचं भावनिक ट्विट; म्हणाले,“महाराज तुमच्या नजरेतलं…”

113

राज्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलंच तापलंय. शिवसेनेच्या एका जागेवर राज्यसभेत उमेदवारी हवी असेल तर संभाजीराजेंनी शिवसेनेत प्रवेश करावा, अशी भूमिका पक्षाकडून घेण्यात आली होती. मात्र संभाजीराजे यांनी त्यास अप्रत्यक्षपणे नकार दिला. त्यावरून तर्कवितर्कांना उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे. अशा चर्चांना बुधवारी स्वतः संजय राऊत यांनी पूर्णविराम दिला आहे. त्यानंतर शिवसेनेनं दिलेला प्रस्ताव नाकारल्यानंतर राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संभाजीराजे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. भाजप आणि महाविकास आघाडीने त्यांना पाठिंबा न देण्याचा निर्णय घेतलाय, ज्यानंतर संभाजीराजे आणि त्यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. दरम्यान, संभाजीराजेंचं भावनिक ट्विट देखील चर्चेत आले आहे.

काय केलं ट्विट…

शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होतानाचा संभाजीराजे यांनी एक फोटो ट्वीट केला. यावेळी त्यांनी पाठिंबा देण्याचे आव्हान देखील केले. ‘महाराज… तुमच्या नजरेतलं स्वराज्य मला घडवायचंय. मी कटीबद्ध असेन तो तुमच्या विचारांशी, मी बांधील असेन तो फक्त जनतेशी…’ असे या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, संभाजीराजेंना भाजप आणि महाविकास आघाडी सरकारने पाठिंबा देण्याचे नाकारले तरी, मराठा संघटनांचा त्यांना भक्कम पाठिंबा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे.

(हेही वाचा – मध्य रेल्वेचा विशेष Traffic Block; बघा कोणत्या गाड्या रद्द)

बुधवारी संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभा उमेदवारीविषयी विचारले असता संजय राऊतांनी माध्यमांशी बोलताना “आमच्यासाठी तो विषय संपला आहे”, असे म्हणत सुरू असलेल्या या मुद्द्यावर पडदा टाकला.

काय म्हणाले राऊत

शिवसेनेच्या एका जागेवर राज्यसभेत उमेदवारी हवी असेल तर संभाजीराजेंनी शिवसेनेत प्रवेश करावा, अशी भूमिका पक्षाकडून घेण्यात आली होती. मात्र संभाजीराजे यांनी त्यास अप्रत्यक्षपणे नकार दिला. त्यामुळे शिवसेनेने कोल्हापूर मधील दुसऱ्या नेत्याला उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यावरून आता तर्कवितर्कांना उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच या चर्चांना स्वतः संजय राऊत यांनी पूर्णविराम दिला आहे. यावेळी राऊत म्हणाले की, आमच्याकडून संभाजीराजेंचा विषय संपला आहे. मराठा संघटना संजय राऊत आणि शिवसेनेला हे महागात पडेल अशा धमक्या देत आहे. पण संजय राऊतांचा या गोष्टींशी व्यक्तिगत संबंध काय? शिवसेनेचा तरी काय संबंध? जे अशा धमक्या देत आहेत, त्यांनी मागच्या काही दिवसांतल्या घडामोडींचा अभ्यास करावा, असेही ते म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.