नार्कोटिक कंट्रोल ब्युरो (एनसीबी) चे अधिकारी समीर वानखेडे यांची विभागीय चौकशी सुरू झाली आहे. वानखेडे यांची चौकशी करण्यासाठी दिल्लीहून पाच एनसीबीचे अधिकारी मुंबईत दाखल झाले आहेत. कारवाईच्या बदल्यात पैशांची मागणी केल्याच्या आरोपाचा तपास या चौकशी अधिकाऱ्याच्या तपास पथकाकडून केला जात आहे. हा तपास सुरू झाल्यापासून अंमली पदार्थांची आवक, विक्री आणि सेवन यावर आळा घालणे समीर वानखेडे यांना चांगलेच महागात पडल्याचे म्हटले जात आहे.
वानखेडेंवर आरोप-प्रत्यारोपाचं सत्रं सुरूच
गेल्या दीड वर्षात समीर वानखडे यांनी अंमली पदार्थ सेवन करणाऱ्यांवर शेकडो कारवाया केल्या आहेत. यामध्ये त्यांनी अनेक प्रसिद्ध बॉलीवूड कलाकारांनाही चौकशीसाठी बोलावले होते. यामध्ये सध्या किंगखान शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान त्याच्या कारवाईनंतर कोठडीत आहे. परंतु केलेली ही कारवाई नार्कोटिक कंट्रोल ब्युरोचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांना महागात पडली आहे. आता त्यांच्यावर आरोप-प्रत्यारोपाचं सत्रंच सुरू झाले आहेत. यामध्ये महाराष्ट्र सरकारच्या एका मंत्र्याची मोठी भूमिका असल्याचे दिसतेय.
(हेही वाचा -दादरमध्ये ‘तेजस्विनी बस’ला अपघात; चालक-वाहकासह चार जण गंभीर)
तपासाच्या जाळ्यात वानखेडे!
समीर वानखेडे यांच्याविरोधात आणखी एक विभागीय चौकशी सुरू आहे, तर दुसरीकडे मंत्री नवाब मलिक त्यांच्या जात, धर्म यावरून त्यांच्या कुटुंबीयांवर दररोज निशाणा साधत आहेत. मात्र याला वानखेडे कुटुंबीयांकडून प्रत्युत्तर दिले जात आहे, मात्र मंत्र्यांच्या राजकीय दबावासमोर अधिकाऱ्याने काही प्रमाणात मौन बाळगल्याचे दिसतेय. त्यामुळे विभागीय तपासाच्या जाळ्यात सापडलेल्या समीर वानखेडे यांची चौकशी मुंबई पोलिसांतील दोन एसीपी दर्जाचे अधिकारी करणार आहेत. समीर वानखेडे यांच्यावर दाखल झालेल्या चार गुन्ह्यांचा तपास हे अधिकारी करणार आहेत.
Join Our WhatsApp Community