भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने डॉ. आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी एनसीबीचे माजी अध्यक्ष समीर वानखेडे दादर येथील चैत्यभूमी येथे आले. त्यावेळी प्रसारमाध्यमांनी त्यांना राष्ट्रवादीचे नेते, मंत्री नवाब मलिकांवरील कारवाईसंबंधी प्रश्न विचारताच वानखेडे यांनी चक्क हात जोडले.
वानखेडेंनी साधला माध्यमांशी संवाद
डॉ. बाबासाहेब पुरंदरे यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्ताने त्यांना अभिवादन करण्यासाठी दादर येथील चैत्यभूमी येथे अनुयायांनी गर्दी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी डॉ. आंबेडकरांना अभिवादन केले. यानंतर सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले ते म्हणजे एनसीबीचे माजी अध्यक्ष समीर वानखेडे. समीर वानखेडेंनी बाबासाहेबांना अभिवादन केल्यानंतर प्रसारमाध्यमांशीबी संवाद साधला. यावेळी त्यांनी तरुणांना आवाहन केले की ‘बाबासाहेब आंबेडकरांना आपले आदर्श माना आणि त्यांनी केलेला संघर्ष, सिद्धांत यांचे पालन करा’. यानंतर नवाब मलिकांची संपत्ती जप्त झाली आहे, याबाबत समीर वानखेडे यांना प्रश्न विचारण्यात आला. मात्र याबाबत काहीही बोलण्यास त्यांनी नकार दिला आणि हात जोडून ते तिथून निघून गेले.
(हेही वाचा शरद पवारांनी मागावी जाहीर माफी…मनसेने बाबासाहेब पुरंदरेंचे ‘ते’ पत्र समोर आणले)
वानखेडे चर्चेत आले होते
समीर वानखेडे यांनी कॉर्डिलिया क्रुझवरील पार्टीवर छापा टाकत शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह इतर 8 जणांना अटक केली होती. आर्यन खानच्या अटकेनंतर मोठा वाद निर्माण झाला होता. यानंतर समीर वानखेडे चांगलेच चर्चेत आले होते. नवाब मलिकांनी यावेळी वानखेडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. त्यानंतर ईडीने मलिक यांना मनी लॉण्डरिंग प्रकरणात अटक केली आहे. ईडीने नवाब मलिकांचे मुंबईतील पाच फ्लॅटवर जप्ती आणली आहे. यातील तीन फ्लॅट हे कुर्ला तर दोन फ्लॅट हे वांद्रे परिसरातील आहेत. ईडीने नवाब मलिक यांची उस्मानाबाद येथील 148 एकर शेतजमीनही ताब्यात घेतली आहे. ईडीने मलिकांच्या एकूण 9 मालमत्तांवर टाच मारली आहे. या प्रकरणाचा तपास ईडी आणि एनआयएकडून सुरु आहे. तसेच नवाब मलिकही सध्या अटकेत आहेत.
Join Our WhatsApp Community