‘किचन पॉलिटीक्समधून बाहेर या’, नवाब मलिकांवर क्रांती रेडकर भडकल्या

'मलिकांनी केलेले सर्व आरोप चोमडेपणासारखे'

129

मुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणानंतर होत असलेल्या आरोपांमुळे एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सातत्याने होत असलेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे अडचणीत सापडलेले समीर वानखेडे हे विभागीय चौकशीकरिता दिल्लीच्या एनसीबी मुख्यालयात दाखल झाले आहेत.

यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक वारंवार समीर वानखेडे यांच्यावर आरोप करत आहे. यामध्ये खंडणी, लाचखोरी आणि बनावट कागदपत्राद्वारे नोकरी मिळवल्याचे गंभीर आरोप मलिकांनी केले आहे. या आरोपांना समीर वानखेडे यांची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत नवाब मलिकांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.

मलिकांचे सर्व आरोप चोमडेपणासारखे

वानखेडे यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांसंदर्भात क्रांती रेडकर यांनी यावेळी सर्व आरोप फेटाळून लावले असून करण्यात आलेले मलिकांचे आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगत क्रांती रेडकर मलिकांवर भडकल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी असे म्हटले की, ‘आजकाल बायकापण असं वागत नाहीत, महिलांचे विचार पुढारलेले आहे पण किचनमध्ये चोमडेपणा करतात ना? तुला माहिती आहे का, असं झालं तर झालं? हे सर्व तसंच किचन पॉलिटिक्स सुरू आहे.’, तसेच मलिकांनी केलेले सर्व आरोप चोमडेपणासारखे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

(हेही वाचा-जनाब राऊत तुम्हाला नबाव मलीकांच्या नजरेतूनच हिंदुस्थान पाहायचाय, चित्रा वाघ यांचा आरोप)

‘विजय सत्याचाच होतो’

गेल्या १५ वर्षांपासून समीर वानखेडे काम करत आहेत. त्यांनी त्यांच्या कामात कधीही खोटेपणा केला नाही. त्यामुळे त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप तथ्यहीन आहे. ट्विटरवर कोणीही काहीही बोलू शकत नाही. ते बोलण्यासही ठोस बाजू हवी. वानखेडे या प्रकरणातून लवकरच बाहेर पडणारच. शेवटी विजय सत्याचाच होणार आहे. वेळेच नवाब मलिकांना उत्तर देईल. अजूनही कटकारस्थान केले जातील, अनेक कागदपत्रं तयार केले जातील आणि वानखेडेंना गोवण्याचा प्रयत्न केला जाईल. पण ती गोष्ट सिद्ध करणं सर्वात मोठी गोष्टी आहे. हे लोकं ते सिद्ध करू शकणार नाही, कारण हे सर्व खोटं आहे, असेही क्रांती रेडकर म्हणाल्यात.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.