समीर वानखेडे आणखी ६ महिने गाजवणार कारकीर्द!

भारतीय महसूल सेवेतील २००८चे अधिकारी समीर वानखेडे यांचा अमली पदार्थ विरोधी पथकात काम करत असताना दुसऱ्यांदा कार्यकाळ वाढवण्यात आला आहे.

एनसीबीचे मुंबई विभागाचे प्रमुख समीर वानखेडे यांच्या अमली पदार्थ विरोधी कारवाईतील धडाकेबाज कामगिरी पाहून केंद्र सरकारने त्यांचा कार्यकाळ आणखी सहा महिन्यांनी वाढवला आहे. त्यामुळे पुढील सहा महिने वानखेडे त्यांची कारकीर्द आणखी गाजवणार हे निश्चित आहे.

सुशांत सिंह प्रकरणाच्या तपासासाठी केलेली पोस्टिंग   

भारतीय महसूल सेवेतील २००८चे अधिकारी समीर वानखेडे यांचा अमली पदार्थ विरोधी पथकात काम करत असताना दुसऱ्यांदा कार्यकाळ वाढवण्यात आला आहे. अभिनेता सुशांत सिंह रजपूत याच्या संशयास्पद मृत्यूचा तपास करण्यासाठी अवघ्या सहा महिन्याच्या कालावधीसाठी वानखेडे यांना एनसीबीमध्ये पोस्टिंग दिली होती. परंतु या प्रकरणाचा तपास करताना वानखेडे यांनी मुंबईतील अमली पदार्थ तस्करी आणि विक्रीची पाळेमुळे खोदून काढली. बॉलीवूडमधील ड्रग तस्करीचे कनेक्शन उद्ध्वस्त केले.

(हेही वाचा : समीर वानखेडेंच्या मागे गुप्तहेर…पोलिस महासंचालकांकडे केली तक्रार)

अमली पदार्थांचे रॅकेट केले उद्ध्वस्त

समीर वानखेडे यांनी अवघ्या मुंबईतील अमली पदार्थांचा धंदा उद्ध्वस्त केला. यामध्ये बॉलीवूडच्या दिग्ग्ज कलाकरांचा समावेश आहे. त्याच बरोबर वानखेडे यांनी कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याचा अमली पदार्थाचा धंदा उद्ध्वस्त केला. विशेष म्हणजे वानखेडे यांनी एनसीपीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या जावयाला अटक केली आहे. आता नुकतेच त्यांनी किंग खानचा मुलगा आर्यन खान याला अटक केली आहे. तेव्हापासून वानखेडे यांच्यावर मलिक दररोज नवनवीन आरोप करून त्यांना लक्ष्य करत आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here