समृद्धी महामार्गावर शिंदे-फडणवीस एकाच गाडीत, स्टेअरिंग मात्र शिंदेंच्या हाती

100
जगातील सर्वात मोठा महामार्ग म्हणून ओळख बनलेल्या समृद्धी महामार्गाचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ डिसेंबर रोजी होणार आहे, मात्र त्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महामार्गाची पाहणी केली. त्यावेळी हे दोघे एकाच वाहनात बसले होते, मात्र वाहनाचे स्टेअरिंग मुख्यमंत्री शिंदे यांच्या हातात होते.

शिंदे-फडणवीस आले एकत्र

सध्याचे सरकार एकनाथ शिंदे गटाच्या मदतीने भाजपने स्थापन केले आहे. त्यामुळे या सरकारवर देवेंद्र फडणवीस यांचे नियंत्रण आहे, अशी चर्चा सुरु आहे, मात्र आज समृद्धी महामार्गाच्या पाहणीच्या वेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी फडणवीस बाजूला बसलेल्या वाहनाचे सारथ्य करून राज्यावर आपला अकुंश असल्याचे दाखवून दिले आहे. ११ डिसेंबरला समृध्दी महामार्गाच्या ५२० किलोमीटर नागपूर- शिर्डी पर्यतच्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. त्यापूर्वी रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर-शिर्डी मार्गाचा पाहणी दौरा नागपूरपासून सुरू झाला. त्यावेळी शिंदे आणि फडणवीस हे एकाच गाडीतून दौ-यासाठी दुपारी १२.४० च्या सुमारास निघाले. त्यावेळी फडणवीस गाडी चालवत होते. रस्याचे काम सुरू असताना शिंदे यांनी या मार्गावर गाडी चालवली. आता मी चालवत आहे, असे फडणवीस म्हणाले. या पाहणी दौ-यात रस्ते विकास महामंडळ, महसूल, पोलीस खात्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.