जगातील सर्वाधिक लांबीचा म्हणून ओळख बनलेला ५५ हजार कोटींच्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर आता या महामार्गावरील तोल वसुलीचा विषय चर्चेला येत आहे. कुणाला या महामार्गावरून मोफत प्रवास करता येणार, अशी चर्चा रंगू लागली आहे. परंतु आता या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे. या महामार्गावरून आमदार आणि खासदार यांना टोल माफी नसणार. केवळ मोजक्याच महत्वाच्या लोकांच्या वाहनाला या महामार्गावरून टोल माफी असणार आहे.
समृद्धी महामार्गावर प्रवास करण्यासाठी १० डिसेंबर २०३२ पर्यंत म्हणजेच पुढील तब्बल दहा वर्षे टोल आकारला जाणार आहे. ज्यात कार, जीप, व्हॅन या हलक्या वाहनांना १० डिसेंबर २०२५ पर्यंत प्रति कि.मी. १.७३ रुपये टोल आकारला जाणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने त्यात वाढ होऊन शेवटच्या दीड वर्षात २.९२ रुपये प्रति कि.मी. या दराने पथकर आकारण्यात येणार असल्याची माहिती प्रसिद्ध करण्यात आलेल्या राजपत्रात दिली गेली आहे.
कोणाचा होणार मोफत प्रवास?
समृद्धी महामार्गावर राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, उपराज्यपाल, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, लोकसभेचे सभापती व राज्यसभेचे अध्यक्ष, विधान परिषद सभापती, विधानसभा अध्यक्ष, उच्च न्यायालयांचे न्यायमूर्ती, राज्य मंत्रिमंडळातील मंत्री, राज्य दौर्यावरील परदेशी मान्यवर, लष्कर व पोलिसांची वाहने, अग्निशमन दलाची वाहने व रुग्णवाहिका यांना टोलमाफी असणार आहे.
Join Our WhatsApp Community