Samruddhi Mahamarg : अजित पवारांनी विचारला ‘हा’ खोचक प्रश्न

168

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी दरम्यानचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या टप्प्याचे लोकार्पण करण्यात आले. मोठ्या धुमधडाक्यात या कार्यक्रमाचे संपन्न झाले. अशा वेळी राष्ट्रवादीचे नेते, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी खोचक प्रश्न उपस्थित केला आहे. त्यामुळे अजित पवार यांनी सर्वांचे लक्ष केंद्रित केले आहे.

काय म्हणाले अजित पवार? 

जपळपास ७५ हजार कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात आले. समृद्धी महामार्ग प्रकल्पाच्या सुरुवातीपासूनच यावरून स्थानिक जमीन अधिग्रहण ते कंत्राटापर्यंत अनेक बाबींवर वाद झाले. त्यातून राजकीय आरोप-प्रत्यारोपही झाले. दरम्यान, अजित पवारांनी यावेळी समृद्धी महामार्गावरील वेगासंदर्भात प्रश्न उपस्थित केला. मला कधीकधी प्रश्न पडतो की, मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गाडीचा वेग १००, दुसऱ्या कुठल्या रस्त्यावर गाडीचा वेग ८० आणि समृद्धी महामार्गावर गाडीचा वेग १५० प्रति तास वेग आहे. एवढी तफावत तिथे आहे. कुठल्या निकषांवर ही वेगवेगळी वेगमर्यादा घालण्यात आली. पण कधीतरी चर्चा निघेल, तेव्हा मी नक्की विचारेन की यामागचे नेमके गमक काय आहे? लोकांनी नक्की काय समजावे? उद्या कुणी यावर न्यायालयात गेले, तरी तिथे उत्तर द्यावे लागेल, असेही अजित पवार म्हणाले.

(हेही वाचा Gujarat Assembly Election result : गुजरातने ‘नरेंद्र’चा रेकॉर्ड मोडला – पंतप्रधान मोदी)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.