शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सत्ता स्थापनेवरुन महायुतीवर निशाणा साधला होता. दरम्यान राऊतांच्या या टीकेला आता संजय शिरसाट (Sanajy shirsat) यांनी प्रत्त्युत्तर दिलं आहे. भाजपाने (BJP) शिंदेंना केंद्रीय गृहमंत्रीपदाची ऑफर दिली असेल. भविष्यात पंतप्रधानपदाचं आश्वासन दिलं असेल. महाराष्ट्रात भाजपचाच मुख्यमंत्री बनेल यात माझ्या मनात शंका नाही, असे संजय राऊत म्हणाले होते. यावर शिरसाट यांनी कोणाला पंतप्रधान, मुख्यमंत्री बनवावं हा आमचा विषय आहे, विरोधकांकडे रडत बसण्याशिवाय दुसरं काम नाही. असा टोला लगावला आहे. (Sanajy shirsat)
(हेही वाचा-Manipur Violence: मणिपूरमध्ये अतिरेक्यांविरोधात कारवाई सुरू; सुरक्षेसाठी CAPF च्या 288 कंपन्या तैनात)
आम्हाला आमचं सरकार कधी स्थापन करायचं, ते कसं चालवायचं हे आम्ही ठरवू, तुम्ही आता फक्त घोषणा देण्याचं काम करा. असंही शिरसाट (Sanajy shirsat) म्हणाले आहेत. 26 तारखेपर्यंत सरकार स्थापन होणार होतं, पण आता ती तारीख उलटून गेली आहे तरीही सरकार स्थापना झालेली नाही. त्यांच्या तंगड्यात तंगड्या अडकल्या आहेत, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली होती. यावर संजय शिरसाट म्हणाले, असं काहीहीह नाही, आमच्या कुठेही तंगड्यात तंगड्या अडकलेल्या नाहीत. देवेंद्र फडणवीस, अजित पवार किंव एकनाथ शिंदे, सर्व नेते निवांत आहेत. सरकार व्यवस्थितपणे स्थापन होईल, तुम्हाला 2-4 दिवसांत दिसून येईल. त्यांचा शपथविधी मोठ्या प्रमाणात होईल.
(हेही वाचा-Earthquake: गुजरात, भिवंडीत अनेक ठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के!)
भाजपचा शब्द गांभीर्याने घेऊ नये, असे संजय राऊत म्हणाले होते. त्यावरही संजय शिरसाट (Sanajy shirsat) यांनी प्रत्युत्तर दिलं. कोट्यवधी लोकांनी विश्वास ठेवला, भाजप असो की शिवसेना मोठ्या प्रमाणात आमदार निवडून आलेत ना. काहीतरी कारण असेल ना. संजय राऊत फक्त जनतेला गृहीत धरू शकतो. जनता मूर्ख आहे असं समजून जे तुम्ही राजकारण करत होता ना, जनतेने तुम्हाला तुमची जागा दाखवली आहे. तुम्हाला जो अहंकार होता ना, आमचा चेहरा घेऊन चाला, ही भाषा होती ना तुमची, आता हे चेहरे पहायचीसुद्धा लोकांची इच्छा नाही त्यामुळे लोकांनी तुमच्याविरोधात मतं दिली. तुमचा चेहरा तुम्हीच आता आरशात पहा आणि ठरवा कोणाचा चांगला आहे. असा टोला शिरसाट (Sanajy shirsat) यांनी लगावला.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community