Sanatan Dharma : भारताला अखंड राखणारा सनातन धर्म तोडणाऱ्यांपासून सावध राहा – पंतप्रधान मोदी

121
Sanatan Dharma : भारताला अखंड राखणारा सनातन धर्म तोडणाऱ्यांपासून सावध राहा - पंतप्रधान मोदी

संत रविदास, माता शबरी आणि महर्षी वाल्मिकी यांचे प्रतिबिंब असणाऱ्या (Sanatan Dharma) सनातन संस्कृतीच्या सामर्थ्याने स्वातंत्र्यलढ्यातील योद्ध्यांना प्रेरणा दिली. असे असताना भारताला एकसंध ठेवणाऱ्या सनातन संस्कृतीला तोडू पाहणाऱ्या प्रवृत्तींपासून जनतेने सावध राहावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ते काल म्हणजेच १४ सप्टेंबर रोजी मध्य प्रदेशात विकास प्रकल्पांच्या पायाभरणी कार्यक्रमादरम्यान बोलत होते.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, नव्याने स्थापन झालेल्या आघाडीला (Sanatan Dharma) सनातन संस्कृतीला संपवायचे आहे, याकडे लक्ष वेधत, आपल्या सामाजिक कार्याने देशाच्या श्रद्धेचे रक्षण करणाऱ्या देवी अहिल्याबाई होळकर , इंग्रजांना आव्हान देणाऱ्या झाशीची राणी लक्ष्मीबाई, प्रभू श्रीरामाकडून प्रेरित होऊन अस्पृश्यता निवारण चळवळ हाती घेणारे महात्मा गांधी,समाजातील विविध कुप्रथांविरोधात लोकांना जागरुक करणारे स्वामी विवेकानंद आणि भारतमातेच्या रक्षणाचा विडा उचलणाऱ्या आणि गणेशपूजेला स्वातंत्र्य चळवळीशी जोडणाऱ्या लोकमान्य टिळक यांचा देखील पंतप्रधानांनी यावेळी उल्लेख केला.

(हेही वाचा – Asia Cup 2023 : चुरशीच्या लढतीत पाकिस्तानला २ गड्यांनी हरवत श्रीलंकन संघ आशिया चषकाच्या अंतिम फेरीत)

एकीकडे नवा भारत जगाला एकत्र आणण्यात आणि विश्वामित्र (Sanatan Dharma) म्हणून उदयास येण्यात आपले कौशल्य दाखवत आहे, तर दुसरीकडे अशा काही संघटना आहेत ज्या राष्ट्र आणि समाजात फूट पाडत आहेत. नुकत्याच स्थापन झालेल्या युतीचा संदर्भ देत ते म्हणाले की, त्यांची धोरणे भारतीय मूल्यांवर आघात करणे आणि सर्वांना एकत्र आणणारी हजारो वर्षे जुनी विचारधारा, तत्त्वे आणि परंपरा नष्ट करण्यापुरती मर्यादित आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.