शिवसेना नेते संजय राऊत यांनी मंगळवारी शिवसेना भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजप नेत्यांवर जोरदार टीका केली. पत्रकार परिषद घ्यायच्या आधीच त्याची फार मोठी हवा झाली होती. संजय राऊत नेमके काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यांनी भाजप नेत्यांवर केलेल्या आरोपांनंतर सर्व स्तरांतून प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यांच्या पत्रकार परिषदेपेक्षा नेत्यांनी ट्वीट करत दिलेल्या प्रतिक्रियांचाच जास्त गाजावाजा असल्याचे पहायला मिळत आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी देखील या पत्रकार परिषदेनंतर एक ट्वीट केले आहे. पत्रकार परिषद असा हॅशटॅग लिहीत त्यांनी एक फोटो या ट्वीटद्वारे शेअर केला आहे. त्यातून त्यांना नेमकं काय सुचवायचं आहे, हे ट्वीट बघितल्यावर तुम्हालाच कळेल.
(हेही वाचाः अपशब्द वापरणं ही राऊतांची संस्कृतीच! भाजप नेत्यांचे टीकास्त्र)
#पत्रकार_परिषद pic.twitter.com/Ruom6vjGdR
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) February 15, 2022
त्यांच्या या ट्वीटवर भाजप नेत्यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिल्या आहेत. भाजप आमदार प्रसाद लाड यांनी देखील या ट्वीटवर कमेंट करताना एक फोटो शेअर केला आहे आणि 0 पे आऊट अशी कमेंट केली आहे. तसेच पत्रकार परिषद संपली, पण भाजपचे साडे तीन नेते कोण? असेही प्रश्न देशपांडे यांच्या या ट्वीटवर विचारण्यात येत आहेत.
(हेही वाचाः राऊतांच्या आरोपांवर सोमय्यांची पहिली प्रतिक्रिया! काय दिले प्रत्त्युत्तर? वाचा)
चित्रा वाघ कडाडल्या
संजय राऊत आणि चित्रा वाघ यांच्यातील शाब्दिक वॉर हे महाराष्ट्राच्या जनतेसाठी काही नवीन नाहीत. मंगळवारी चित्रा वाघ यांनी ट्वीट करत आपला संताप व्यक्त केला. ही कसली पत्रकार परिषद? महाराष्ट्राच्या संस्कृतीची लक्तर काढलीत…भाषेची पातळी इतकी घसरलेली की समोर महिला पत्रकार सुद्धा आहेत याचं भान ही सर्वज्ञानींना राहिलं नाही हे दुर्दैव… आणि ज्या अविर्भावात आरोप केलेत, सरकार तुमचंच. मग पुरावे होते तर कारवाई का नाही केलीत ??, अशा शब्दांत वाघ यांनी राऊतांना जाब विचारला आहे.
हि कसली पत्रकार परीषद….
महाराष्ट्राच्या संस्कृतीची लक्तर काढलीत…भाषेची पातळी इतकी घसरलेली कि समोर महिला पत्रकार हि आहेत याचं भान ही सर्वज्ञानींना राहीलं नाही हे दुदैव….
आणि ज्या अविर्भावात आरोप केलेत सरकार तुमचंच मग पुरावे होते तर कारवाई का नाही केलीत ??#फुसकाबार
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) February 15, 2022
(हेही वाचाः सरकार पाडण्यासाठी ईडीच्या धाडी! संजय राऊतांचा आरोप)
नितेश राणेंचा जोरदार हल्ला
कायमंच संजय राऊत यांना आपल्या राणेशाही शैलीत उत्तर देणारे भाजप आमदार नितेश राणे यांनी देखील या पत्रकार परिषदेनंतर ट्वीट करत संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.
चाटायचं असेल तेव्हा .. पवार साहेब!!
चावायचं असेल तेव्हा.. बाळासाहेब !!
याला म्हणतात.. लोंबत्या राऊत!!
— nitesh rane (@NiteshNRane) February 15, 2022
अमृता वहिनींचे देखील ट्वीट
तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आजवर अनेकदा खोचक शब्दांत महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांवर टीका केली आहे. संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेनंतर अमृता फडणवीस यांनी देखील ट्वीट केले आहे. त्यातून त्यांना काय दर्शवायचे आहे हे देखील तुम्हाला कळेलंच. इतके सूज्ञ तुम्ही नक्कीच आहात.
(हेही वाचाः शिवसेना भवन झाले ‘कोरोना मुक्त’?)
आज फिर एक बिल्ली ने दहाड़ने की कोशिश की है !#Maharashtra
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) February 15, 2022
आता त्यांच्या या ट्वीटनंतर शिवसेनेच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी देखील अमृता फडणवीस यांच्या ट्वीटला सूचक असे एक ट्वीट केले. त्यामुळे पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी भाजपवर फेकलेल्या बाणांनंतर ट्विटरवर देखील वाक्बाणांचे युद्ध चांगलेच रंगले आहे.
Join Our WhatsApp Communityशेर की दहाड से डरी हूई बिल्लीया आवाज निकालाने की कोशीष कर रही है।
मामी गप्प बसा!#SanjayRaut #ShivSena #Mumbai #Maharashtra #BJP @ShivsenaComms @rautsanjay61
— Dr.Manisha Kayande (@KayandeDr) February 15, 2022