Uddhav Thackeray यांच्या बिनशर्ट पाठिंब्याच्या टीकेवर मनसेचं चोख प्रत्त्युत्तर!

235
Uddhav Thackeray यांच्या बिनशर्ट पाठिंब्याच्या टीकेवर मनसेचं चोख प्रत्त्युत्तर!
Uddhav Thackeray यांच्या बिनशर्ट पाठिंब्याच्या टीकेवर मनसेचं चोख प्रत्त्युत्तर!

शिवसेना पक्षाचा ५८ वा वर्धापन दिन बुधवारी (१९ जून) पार पडला. शिवसेनेतील फूटीनंतर आता दोन वेगवेगळे वर्धापन दिन साजरे करण्यात आले आहेत. यामध्ये ठाकरे गटाचा (Uddhav Thackeray) वर्धापन दिन मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात साजरा करण्यात आला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्यासह राज ठाकरेंवर टीका केली होती. (Uddhav Thackeray)

(हेही वाचा –TamilNadu : विषारी दारू प्यायल्याने २५ जणांचा मृत्यू!)

लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता. यावर टीका करताना उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, ‘लोकसभा निवडणुकीत काहींनी मोदींना बिनशर्ट पाठिंबा दिला.’ यावर आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांच्या या टिकेवर प्रत्युत्तर देत पलटवार केला आहे. (Uddhav Thackeray)

संदीप देशपांडे काय म्हणाले?

“हिरव्या मतांच्या जोरावर यश मिळवल्यामुळे काही लोक पांचट जोक मारत आहेत. पण येणाऱ्या निवडणुकीत मराठी माणूस यांचे कपडे शाबूत ठेवणार नाही.” अशा खोचक शब्दांत संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.