संदीप देशपांडेंचा आदित्य ठाकरेंना टोला; आम्ही १३व्या मजल्यावरून महिलेला खाली फेकले नाही

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी महिला पोलिसाला मारहाण केल्याचा आरोप आमदार आदित्य ठाकरे यांनी केला होता, त्याचा खरपूस समाचार मनसे नेते संदीप देशपांडे यांनी घेतला आहे.

दिशा सालियनच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी गंभीर आरोप

संदीप देशपांडे यांनी ट्विट करत आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. आम्ही महिला अधिकाऱ्यांना ढकलले नाही ढकलले हा विषय न्यायालयात प्रलंबित आहे. जर धक्का लागला असेल तर चुकून लागला असेल, एक वेळ समजू शकतो, पण आम्ही कुणाला तरी १२व्या, १३व्या मजल्यावरून ढकलून दिले आणि आत्महत्या म्हणून सांगितले आणि त्यांचा मृत्यू झाला, एवढे घाणेरडे आरोप आमच्यावर नाहीत, हे बोलणाऱ्यांनी आधी लक्षात ठेवावे, असे संदीप देशपांडे म्हणाले. आदित्य ठाकरे यांच्यावर दिशा सालियनच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर संदीप देशपांडे यांनी हा आरोप केला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here