मनसेच्या बॅनरवरील बाळासाहेबांच्या फोटोवरुन उद्धव ठाकरेंनी टीका केली होती. यानंतर आता उद्धव ठाकरेंना मनसेकडून (Sandeep Deshpande) प्रत्त्युत्तर देण्यात आलं आहे. ज्या वेळेला हजार एक कोटीचा महापौर बंगला तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने घश्यात घातला. तेव्हा बाळासाहेब तुमचेच कसे राहतात? असा सवाल त्यांनी केला आहे.
हेही वाचा-Kunal Kamra ला दहशतवादी संघटनांकडून पैसे ? राहुल कनाल यांचे गंभीर आरोप
संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) म्हणाले, “माननीय बाळासाहेबांचा फोटो होर्डिंग वर लावणे हे पक्षाचं धोरण नाही. एखाद्या उत्साही कार्यकर्त्याची भावना असू शकते पण श्री उद्धव ठाकरेंना माझा प्रश्न आहे महापौर बंगला घशात घालायचा होता तेव्हा बाळासाहेब देशाचे एरवी ते फक्त तुमचे वडील असं कस काय ?” (Sandeep Deshpande)
माननीय बाळासाहेबांचा फोटो होर्डिंग वर लावणे हे पक्षाचं धोरण नाही .एखाद्या उत्साही कार्यकर्त्याची भावना असू शकते पण श्री उद्धव ठाकरेंना माझा प्रश्न आहे महापौर बंगला घशात घालायचा होता तेव्हा बाळासाहेब देशाचे एरवी ते फक्त तुमचे वडील असं कस काय ?
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) March 28, 2025
संदीप देशपांडे म्हणाले की, ज्या वेळेला हजार एक कोटीचा महापौर बंगला तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने घश्यात घातला. तेव्हा बाळासाहेब तुमचेच कसे राहतात? मग ते तुमचेच वडील राहत नाही. तुमचेचे वडील म्हणून बाळासाहेबांना मर्यादित ठेवायचे असेल तर तुमच्या मालमत्तेवर त्यांचे स्मारक करायचे ना, जेव्हा जनतेची हजार कोटीची मालमत्ता तुम्ही घेतली. त्यावेळेला बाळासाहेब ठाकरे हे देशाचे आहे म्हणतात. मग ते जर देशाचे आहे तर त्यांचा फोटो देशाने वापरला काय आणि अजून कुणी वापरला काय तुम्ही त्यावर आक्षेप घेऊ शकत नाही. (Sandeep Deshpande)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community