Sandeshkhali : नराधम शाहजहान शेखची खैर नाही; बंगाल पोलिसांकडून तपास CBI ला देण्याचा उच्च न्यायालयाचा आदेश

TMC चा नेता शाहजहान शेख याला पश्चिम बंगाल पोलिसांनी अटक करून त्याला संरक्षण देण्याचा प्रयत्न केला आहे.

271

पश्चिम बंगालमधील संदेशखाली (Sandeshkhali) येथील महिलांवर अनेक वर्षे अत्याचार करणारा TMC चा नेता शाहजहान शेख याला पश्चिम बंगाल पोलिसांनी अटक करून त्याला संरक्षण देण्याचा प्रयत्न केला. एफआयआरमध्ये महिलांवर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्ह्याचा समावेश करण्यात आला नव्हता. आता कोलकाता उच्च न्यायालयाने हा तपास CBI कडे सुपूर्द करण्याचा महत्वाचा निर्णय दिला आहे. त्यामुळे नराधम शाहजहान शेखची खैर नाही.

अनेक दिवसांपासून पीडित महिलांची निदर्शने 

संदेशखालीमध्ये (Sandeshkhali) महिलांची शहाजहान शेख याच्या विरोधात जोरदार निदर्शने अनेक दिवस सुरु आहेत. अनेक दिवस चाललेल्या राजकीय गोंधळानंतर पोलिसांनी 29 फेब्रुवारी रोजी टीएमसी नेते शाहजहान शेख यास अटक केली होती. शाहजहान शेख 55 दिवसांपासून फरार होता. शाहजहान शेखवर महिलांचा लैंगिक छळ आणि जमीन बळकावण्याचे अनेक आरोप आहेत.

(हेही वाचा Facebook आणि Instagram app पुन्हा सुरू; डाऊन होताच जगभरातील नेटकऱ्यांनी पाडला मिम्सचा पाऊस)

शाहजहान शेखला १० दिवसाची पोलीस कोठडी 

पश्चिम बंगालचे अतिरिक्त पोलिस महासंचालक यांनी सांगितले की, उत्तर परगणा जिल्ह्यातील सुंदरबनच्या बाहेरील भागापासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या मिनाखान पोलिस स्टेशन क्षेत्रातील एका घरातून शाहजहान शेखला अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहजहान शेख हा त्याच्या काही साथीदारांसह घरात लपला होता. अटकेनंतर शेखला बशीहाट न्यायालयात हजर करण्यात आले, त्यानंतर त्याला 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. (Sandeshkhali)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.