Sandeshkhali Violence : संदेशखाली येथील नराधम शाहजहान शेखविरोधात कारवाई; Netflix वरील ‘भक्षक’ चित्रपट आणि लोकसभा निवडणूक 2024

२०२४ च्या निवडणुकीच्या आधी पश्चिम बंगालमध्ये संदेशखाली (Sandeshkhali Violence) येथील महिला त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात रस्त्यावर उतरल्या. या प्रकरणातील प्रमुख आरोपी शाहजहान शेख अडचणीत आल्याने ममता बॅनर्जी खूप चिंतेत आहेत. यानिमित्ताने ममता सरकारला सेटबॅक बसला आहे. त्यामुळे २०२४ ची निवडणूक ममता बॅनर्जी यांना सोपी असणार नाही, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

227

सध्याच्या युगात माध्यमांमध्ये सोशल मीडिया हे असे प्रभावी माध्यम बनले आहे, ज्याने आजवरच्या सर्व पारंपरिक माध्यमांना मागे टाकले आहे. त्यामुळे सध्या कोट्यवधी रुपये खर्च केलेले सिनेमेदेखील ओटिटी प्लॅटफॉर्ममध्ये प्रदर्शित होत आहेत. त्यातलाच एक Netflix वर मागच्या आठवड्यात प्रदर्शित झालेला भक्षक हा चित्रपटही लोकांच्या चांगलाच पसंतीला पडत आहे, कारण भक्षक चित्रपटातील कथा आणि संदेशखाली (Sandeshkhali Violence) येथील महिला अत्याचाराचे प्रकरण यात बऱ्यापैकी साम्य आढळून येत आहे. त्यामुळे नराधम शहाजहान शेख याच्यावर कारवाई होणे, तसेच लोकसभेच्या निवडणुकीची धामधूम सुरु होणे आणि भक्षक चित्रपट प्रदर्शित होणे या तिन्ही घटना नक्कीच योगायोग म्हणता येणार नाही.

काय आहे भक्षक चित्रपटाचे कथानक? 

भक्षक चित्रपटात मराठमोळी अभिनेत्री भूमी पेडणेकर प्रमुख भूमिकेत आहे. तिला बालगृहातील बाल शोषण आणि अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांची माहिती मिळते. ती गुन्हेगारांना शिक्षा होण्यासाठी या प्रकरणांच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करते. तेव्हा या न्याय मिळवून देण्यास तयार आहे. या बालगृहात होत असलेल्या गैरप्रकाराला स्थानिक बड्या राजकारण्यांचे पाठबळ असल्याने त्यावर कारवाई करण्यास कोणीही तयार नसल्याचे समोर येते. हा सगळा प्रकार बालगृह, स्थानिक राजकीय नेतेमंडळी आणि स्थानिक पोलीस यांच्या संगमताने होते असल्याचे तिला समजते. त्यानंतर भूमी पेडणेकर या सगळा सापळा उद्ध्वस्त करते, असे एकंदरीत या चित्रपटाचे कथानक आहे. अशीच घटना संदेशखाली (Sandeshkhali Violence) येथे घडत होती. टीएमसी नेते शाहजहान शेख हा तिच्या गुंडांच्या सहकार्याने गावातील विवाहित तरुण महिलांना पक्ष कार्यालयात रात्री बोलावून घ्यायचा, कुणी तयार होत असेल तर जबरदस्तीने, त्या महिलेचा नवरा, सासरा अशा पुरुष मंडळींना बदाम मारहाण करून त्यांच्या समोर त्याच्या बायकोला घेऊन जात आणि पक्ष कार्यालयात रात्रभर अत्याचार करून सकाळी सोडून देत असत. असे प्रकार अनेक वर्षे सुरु होते. पण शाहजहान शेख याला टीएमसी पक्षाचे पर्यायाने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे राजकीय पाठबळ  असल्याचे समजते. मात्र आता संदेशखाली येथील पीडित महिला रस्त्यावर उतरल्या आणि नराधम शाहजहान शेखला बेड्या ठोकल्या.

(हेही वाचा Sandeshkhali Case : अत्याचारी शाहजहान शेखच्या मुसक्या आवळल्या; पश्चिम बंगाल पोलिसांनी केली अटक)

संदेशखालीसारखा अत्याचार याआधीही चित्रपटांमधून दिसला 

शाहजहान शेख याचे वर्तन फिल्मी स्टाईलचेच होते. म्हणूनच तो ज्या प्रकारे अत्याचार करायच्या, त्या पद्धतीचे अत्याचार चित्रपटांमधून अनेकदा दाखवण्यात आले आहे. असे कथानक असणारा एक चित्रपट ‘रावडी राठोड’ सर्वांना आठवत असेल. त्यामध्ये गावातला प्रमुख नेता बाबजी आणि त्याचे गुंड गावातल्या लग्न झालेल्या महिलेला जबरदस्ती उचलून घेऊन जातात. तिच्यावर वाट्टेल तसे अत्याचार करतात. पण तिचा नवरा मात्र त्याच बाबजीकडे आपल्या बायकोला शोधण्यासाठी जातो. बाबजीच्याच घरात आपली बायको आहे, तिच्यावर अत्याचार होत आहेत, हे दिसत असतानाही बाबजीच्या ताकदीपुढे, त्याच्या वर्चस्वापुढे हतबल झालेला नवरा खाली मान घालून निघून जातो आणि त्याची बायको तितक्याच हतबलतेने फक्त रडत राहते. रावडी राठोड सिनेमातला हा सिन बघताना अनेकांच्या अंगावर काटा उभा राहिला असेल. पण याच सिनेमाप्रमाणे अत्याचार संदेशखालीमध्ये (Sandeshkhali Violence) अनेक वर्षे अनेक रात्री घडत होते आणि त्यात प्रमुख आरोपी बाबजी शाहजहान शेख आहे.

…म्हणून ममता बॅनर्जी यांना २०२४ची निवडणूक जड जाणार 

२०१४ असो २०१९ असो दोन्ही वेळच्या लोकसभा निवडणुकीत देशभर मोदी लाट होती, पण पश्चिम बंगाल याला अपवाद होता. या ठिकाणी ममता बॅनर्जी यांनी अल्पसंख्यांकांच्या मतांच्या जोरावर मोदी लाट पश्चिम बंगालपुरती तरी रोखली. परंतु २०२४ च्या निवडणुकीच्या आधी पश्चिम बंगालमध्ये संदेशखाली (Sandeshkhali Violence) येथील महिला त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात रस्त्यावर उतरल्या. या प्रकरणातील प्रमुख आरोपी शाहजहान शेख अडचणीत आल्याने ममता बॅनर्जी खूप चिंतेत आहेत. यानिमित्ताने ममता सरकारला सेटबॅक बसला आहे. त्यामुळे २०२४ ची निवडणूक ममता बॅनर्जी यांना सोपी असणार नाही, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.