शिक्षण समिती अध्यक्षपदी सेनेच्या संध्या दोशी!

अखेरच्या क्षणी काँग्रेस उमेदवार आशा कोपरकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने शिवसेना उमेदवार संध्या दोशी यांचा मार्ग सुकर झाला.

मुंबई महापालिकेच्या शिक्षण समिती अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शेवटच्या क्षणाला काँग्रेस उमेदवार आशा कोपरकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. काँग्रेसने आपला अर्ज मागे घेतल्याने शिवसेना उमेदवार संध्या दोशी यांचा मार्ग सुकर झाला. त्यामुळे शिवसेना विरुद्ध भाजप यांच्यात झालेल्या लढाईत संध्या दोशी या विजयी होत सलग दुसऱ्यांदा त्यांची शिक्षण समिती अध्यक्ष पदी त्यांची निवड झाली. मात्र, शिवसेनेला धडा शिकवायला निघालेल्या या निवडणुकीत काँग्रेसच्या ४ सदस्यांनी तटस्थ राहत आघाडी धर्म निभावला.

संध्या दोशी यांना १३ मते

शिक्षण व स्थायी समिती अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेनेबरोबर भाजप आणि काँग्रेसने आपले उमेदवारी अर्ज दाखल केल्याने चुरस निर्माण झाली होती. परंतु काँग्रेसने अर्ज मागे घेण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार शिक्षण समितीत काँग्रेस उमेदवार आशा कोपरकर यांनी आपला अर्ज शेवटच्या १५ मिनिटाच्या अवधीत मागे घेतला.  त्यामुळे शिवसेना विरुद्ध भाजप अशा रंगलेल्या या लढाईत काँग्रेसने तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. तर भाजपचे उमेदवार पंकज यादव यांना ०९ मते मिळाली. त्यामुळे सेनेच्या उमेदवार संध्या दोशी यांना १३ मते तर घेत सलग दुसऱ्यांदा विजयी ठरल्या.

(हेही वाचा : वैधानिक समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ऑक्टोबर फॉर्म्युला!)

शिक्षण समितीतील पक्षीय मतदान

शिवसेना : ११ अधिक दोन, राकाँ व सपा : एकूण १३

भाजप उमेदवार :

काँग्रेस माघार : एकूण ४ तटस्थ

राष्ट्रवादी काँग्रेस : सदस्य १ (शिवसेनेच्या बाजूने मतदान)

सपा :  १ सदस्य (शिवसेनेच्या बाजूने मतदान)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here