मुंबई महापालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव हे सध्या केंद्रीय तपास यंत्रणेच्या रडारवर आले आहेत. आयकर विभाग जाधवांकडील मालमत्ता तपासात आहे. त्यामध्ये २ कोटी रुपये ‘मातोश्री’ला भेट दिल्याचा उल्लेख डायरीत आढळून आला. त्यावर जाधवांनी आपण आपल्या आईला ‘मातोश्री’ म्हणतो, असे सांगत वेळ मारून नेली, मात्र जाधवांचे हे उत्तर चर्चेत आले आहे. खुद्द मनसे नेते संदीप देशपांडे यांनी यावरून जाधवांना महाभारताची आठवण करून दिली.
काय म्हणाले संदीप देशपांडे?
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी जाधवांवर त्यांच्या या उत्तरावर मार्मिक शब्दांत टीका केली. देशपांडे म्हणाले की, ‘आपल्या घरी आईला ‘मातोश्री’ कोण हाक मारत? मी तर फक्त महाभारत मालिकांमध्ये बघितले होते.’ देशपांडे यांनी अशा प्रकारचे ट्विट करून अप्रत्यक्षपणे जाधव यांना त्यांनी जे उत्तर दिले आहे, हे धादांत खोटे आहे, असे दर्शविण्याचा प्रयत्न केला आहे.
आपल्या घरी आईला "मातोश्री"कोण हाक मारत? मी तर फक्त महाभारत मालिकांमध्ये बघितलं होत.
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) March 28, 2022
सोशल मीडियातूनही जाधव झाले ट्रोल
या प्रकरणी यशवंत जाधव हे सोशल मीडियातही चांगलेच ट्रोल झाले आहेत. योगेश खैरे म्हणाले की, आईसाठी दिलेल्या पैशाची आणि भेटवस्तूची पण डायरीत नोंद ठेवावी लागते…?? अशाने इथून पुढे कुठलीही आई “बाळा, यशवंत हो !” असा आशीर्वाद देईल का ??
आईसाठी दिलेल्या पैशाची आणि भेटवस्तूची पण डायरीत नोंद ठेवावी लागते…??
🤔🤔😄😄अशाने इथून पुढे कुठलीही आई "बाळा, यशवंत हो !" असा आशीर्वाद देईल का ??
— Yogesh Khaire योगेश खैरे (@YogeshKhaire79) March 27, 2022
तर धीरज शिवदे म्हणाले की, आईला सन्मानाने घरी मातोश्री ही म्हणत असतील ते ठीक आहे पण असे ‘मातोश्री’ला 50 लाखाचे घड्याळ गिफ्ट देऊन डियारीमध्ये लिहून ठेवणे हे जरा अतिसमान्यच वाटते नाही का…
आई ला सन्मानाने घरी मातोश्री ही म्हणत असतील ते ठीक आहे पण असं मातोश्री ला 50 लाखाचं घड्याळ गिफ्ट देऊन डियारी मध्ये लिहून ठेवणे हे जरा अतिसमान्यच वाटते नाही का…😅
— Dhiraj S S (@shivade_dhiraj) March 28, 2022
सतीश जोशी म्हणाले की, माफ करा पण असली श्रीमंती नकोच…आईनेच पहिला प्रश्न केला असता कुठून आणलेस एव्हढे पैसे…आय टी अगोदर…उत्तर नसेल तर मी घरा बाहेर असतो…!
Join Our WhatsApp Communityमाफ करा पण असली श्रीमंती नकोच..आईनेच पहिला प्रश्न केला असता कुठुन आणलेस एव्हढे पैसे ..आय टि अगोदर..उत्तर नसेल ठर मी घरा बाहेर असतो…!
— Satish Joshi (@SatishJ39281377) March 28, 2022