Sangli District: सांगली जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू, ७ एप्रिलपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

184
Sangli District: सांगली जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू, ७ एप्रिलपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू
Sangli District: सांगली जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू, ७ एप्रिलपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

लोकसभा निवडणूक, विविध आंदोलने, आगामी सण, उत्सव, यात्रा, जत्रा, उरूस आदिच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सन १९५१ च्या महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) अन्वये प्राप्त अधिकारानुसार, सांगली जिल्हा स्थलसीमा हद्दीत प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे. (Sangli District)

या आदेशानुसार ०७ एप्रिल अखेरपर्यंत (Sangli District) पुढील कृत्ये करण्यास मनाई केली आहे. शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे काठ्या अथवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बरोबर नेण्यास, कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ बरोबर नेण्यास मनाई केली आहे तसेच दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा क्षेपणास्त्रे किंवा सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, जमा करणे आणि तयार करणे, व्यक्तीचे अथवा प्रेते किंवा आकृत्या किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, जाहीरपणे घोषणा करणे, गाणी म्हणणे, वाद्ये वाजविणे, ज्याच्या योगाने शांतता व सुव्यवस्था आणि सार्वजनिक मालमत्तेस धोका निर्माण होईल किंवा सभ्यतेला बाधा येईल अशा पद्धतीने हावभाव करणे, फलक चित्रे किंवा चिन्हे तयार करणे, त्यांचे प्रदर्शन करणे आणि प्रसारीत करणे, जिल्ह्यात परवानगीशिवाय पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तीस सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर एकत्र जमण्यास मनाई केली आहे. हा आदेश कायदेशीर कर्तव्य बजावीत असलेल्या शासकीय कर्मचारी, धार्मिक विधी, अंत्यविधी व परीक्षा यांना लागू राहणार नाही. हा आदेश ०७ एप्रिल रोजीचे २३.५९ वाजेपर्यंत अंमलात राहील, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी जारी केले आहेत. (Sangli District)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.