Sangli Lok Sabha : राज्यातील काँग्रेसचा बंडखोर उमेदवाराला पाठिंबा?

248
Sangli Lok Sabha : राज्यातील काँग्रेसचा बंडखोर उमेदवाराला पाठिंबा?
Sangli Lok Sabha : राज्यातील काँग्रेसचा बंडखोर उमेदवाराला पाठिंबा?
  • सुजित महामुलकर

सांगली लोकसभा (Sangli Lok Sabha) मतदार संघातून विशाल पाटील (Vishal Patil) यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला तर पक्षाचे आमदार विश्वजीत कदम यांच्यासह शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी यांनी त्यांना पाठिंबा दिल्याने काँग्रेसची (Congress) अडचण निर्माण झाली आहे. पाटील आणि कदम यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली तर पक्षाला निवडणुकीत फटका बसू शकतो. तर कारवाई न केल्यास महाविकास आघाडीकडून कारवाईसाठी दबाव येऊ शकतो आणि काँग्रेसचा बंडखोर उमेदवाराला पाठिंबा आहे का? असा प्रश्न उबाठाकडून विचारला जाऊ शकतो. (Sangli Lok Sabha)

(हेही वाचा- Mercedes Benz GLC Coupe : मर्सिडिझ जीएलसीची कूप गाडी भारतात लाँच होण्याच्या तयारीत )

मविआचा धर्म पाळा

सांगली लोकसभा (Sangli Lok Sabha) मतदारसंघाच्या जागेवरून महाविकास आघाडीच्या जागा वाटपात वाद असताना शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट सांगलीत जाऊन महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी परस्पर जाहीर केली आणि वाद शिगेला पेटला. काँग्रेसचे स्थानिक आमदार विश्वजीत कदम यांनी काँग्रेसने (Congress) ही जागा लढवावी आणि विशाल पाटील यांना तिथून उमेदवारी द्यावी, अशी जोरदार मागणी केली. तसेच ‘मैत्रीपूर्ण लढत’ लढण्यास परवानगी द्यावी असा प्रस्तावही हायकमांडपुढे ठेवला. पण काँग्रेस हायकमांडने हा प्रस्ताव साफ फेटाळून लावत मविआचा धर्म पाळा, असा आदेश दिला. (Sangli Lok Sabha)

हायकमांडविरुद्ध भूमिका

विशाल पाटील (Vishal Patil) हे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू आहेत आणि त्यांना स्थानिकांचा जोरदार पाठिंबा असल्याचे चित्र सध्या सांगलीत आहे. काँग्रेसने उबाठासमोर मान टाकल्याने कार्यकर्ते नाराज झाले असून त्यांच्या आग्रहास्तव विश्वास पाटील अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरले. राज्यातील काँग्रेस नेत्यांचाही विशाल पाटील यांना अंतर्गत पाठिंबा असल्याचे बोलले जात आहे, तर पक्षाच्या हायकमांडविरुद्ध भूमिका घेऊ शकत नसल्याने काँग्रेस नेत्यांची आणि पक्षाची मोठी अडचण निर्माण झाली आहे. (Sangli Lok Sabha)

(हेही वाचा- Highest Score in IPL : आयपीएलमध्ये डावात २०० पेक्षा जास्त धावा किती वेळा झाल्यात? )

राजकारणाच्या आखाड्यात चंद्रहार टिकतील?

उबाठाचे (Shiv Sena UBT) उमेदवार चंद्रहार पाटील यांनी कुस्तीचा आखाड्यात विरोधकाला चितपट करून ‘महाराष्ट्र केसरी’ किताब पटकावला. मात्र राजकारणात ‘स्पर्धक’ किंवा विरोधक हा समोर नसल्याने राजकारणाच्या आखाड्यात चंद्रहार कितपत टिकतील किंवा यशस्वी होतील, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. आता यासंदर्भात उबाठा काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. (Sangli Lok Sabha)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.