- मुंबई प्रतिनिधी
राज्यात लोकसभेच्या निवडणुका पार पडतात न पडतात तोच विधान परिषदेवरील (Vidhan Parishad) दोन शिक्षक आणि दोन पदवीधर मतदारसंघांच्या जागांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी सुधारित वेळापत्रक जाहीर केले. नव्या वेळापत्रकानुसार, येत्या २६ जूनला निवडणूक होणार असून, एक जुलै रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यानंतर काही तासातच शिवसेना उबाठा (UBT) पक्षाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब तर मुंबई शिक्षक मतदार संघातून ज.मो. अभ्यंकर (J.M. Abhyankar) यांची नावे घोषित करण्यात आली. (Vidhan Parishad)
मुंबई पदवीधर मतदारसंघातून याआधी शिवसेना उबाठा (UBT) गटाकडून विलास पोतनीस प्रशिक्षक मतदारसंघातून कपिल पाटील (Kapil Patil) निवडून जात होते. यावेळेस आमदार कपिल पाटील हे महाविकास आघाडीमध्ये सामील असताना देखील त्यांच्या पक्षाच्या उमेदवारीचा विचार न करता उद्धव ठाकरे यांनी ज.मो. अभ्यंकर (J.M. Abhyankar) यांची उमेदवारी जाहीर केल्यामुळे कपिल पाटील (Kapil Patil) यांच्या शिक्षक भारती कडून देखील उमेदवार दिला जाणार आहे. यामुळेच महाविकास आघाडी मधून मते दुभंगली जाऊ शकतात. त्यातच भाजपाकडून (BJP) देखील मोठे आव्हान उभे केले जाणार असल्याची चर्चा आहे. (Vidhan Parishad)
उबाठा गटाचे उमेदवार कोण आहेत…
विधान परिषदेच्या चार जागांसाठी निवडणूक जाहीर होताच शिवसेना ठाकरे (UBT) गटाकडून आघाडी घेत पदवीधर मतदार संघातून माजी मंत्री अनिल परब (Anil Parab) तर विधान परिषदेसाठी शिक्षक मतदार संघातून ठाकरे सेनेकडून उमेदवारी जाहीर झालेले ज. मो. अभ्यंकर (J.M. Abhyankar) हे शिवसेनेच्या शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष आहेत. शिक्षकांचे प्रश्न आणि समस्यांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे. (Vidhan Parishad)
महाविकास आघाडी मधील कपिल पाटील (Kapil Patil) यांच्या पक्षाद्वारे शिक्षक मतदार संघात उभा केलेला उमेदवारामुळे महाविकास आघाडी मधील मते विभाजित होणार आहेत त्याचा फायदा नक्कीच भाजपाला होऊ शकतो. (Vidhan Parishad)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community