Congress च्या बंडखोरीचा ‘Sangli Pattern’ विधानसभा निवडणुकीतही

95
Congress च्या बंडखोरीचा ‘Sangli Pattern’ विधानसभा निवडणुकीतही

महाविकास आघाडीतील काँग्रेस (Congress) विरुद्ध शिवसेना उबाठाचा लोकसभा निवडणुकीतील ‘सांगली पॅटर्न’ विधानसभा निवडणुकीतही पहायला मिळण्याची चिन्हे आहेत. काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी सांगली पॅटर्न राबवून काँग्रेस बंडखोर विशाल पाटील यांना लोकसभेवर पाठवले. आता हाच पॅटर्न काही विधानसभा मतदार संघातही राबविला जाणार असल्याचे संकेत खुद्द कदम यांनीच दिले. त्यामुळे शिवसेना उबाठाचे धाबे दणाणले आहेत.

(हेही वाचा – Jammu and Kashmir मध्ये लष्कराकडून दहशतवाद्यांना जोरदार प्रत्युत्तर; ३ दहशतवादी ठार)

‘आम्ही केलं की धाडस’

जुन्नर विधानसभा मतदारसंघात उमेदवारीवरून महाविकास आघाडीतील तीनही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू झाली असतानाच कदम यांनी बंडखोरी कशी होणार, याची झलक नुकतीच दाखवली. जुन्नर मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे (Congress) असला तरी काँग्रेसचे स्थानिक नेते सत्यशील शेरकर या मतदार संघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. कदम यांनी शेरकर यांची भेट घेतली आणि त्यांना पाठिंबा दर्शवत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने जर हा मतदार संघ काँग्रेसला सोडला नाही, तर ‘आपण इथे सांगली पॅटर्न वापरू. नाहीतर तुझ्यासाठी नवा पॅटर्न. आम्ही केलं की धाडस,’ असे शेरकर यांना म्हणत उबाठानंतर आता राष्ट्रवादीला टार्गेट केले.

(हेही वाचा – Piyush Goyal यांनी ‘ते’ वचन पाळले; गणेशोत्सवाआधी पश्चिम रेल्वेवरून…)

शरद पवारांच्या संपर्कात बेनके

राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) विद्यमान आमदार अतुल बेनके यांनी गेल्या काही दिवसांत शरद पवार यांच्या भेटी घेतल्या. त्यामुळे बेनके हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश करणार असल्याचीही चर्चा जुन्नर तालुक्यात सुरू आहे. मात्र शेरकर यांनी बंडखोरी केली तर बेनके यांचे निवडून येण्याचे स्वप्न भंग होईल, एवढे नक्की. तर बेनके यांनी अजित पवार यांची साथ सोडली नाही आणि त्यांना तिकीट मिळाले तर बेनके विरुद्ध शेरकर असा थेट सामना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (Congress)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.