Sanjay Jaiswal : शाहबानो प्रकरणाप्रमाणेच काँग्रेसला राममंदिराचा निर्णय बदलायचा आहे; काय म्हणाले संजय जयस्वाल ?

176
Sanjay Jaiswal : शाहबानो प्रकरणाप्रमाणेच काँग्रेसला राममंदिराचा निर्णय बदलायचा आहे; काय म्हणाले संजय जयस्वाल ?
Sanjay Jaiswal : शाहबानो प्रकरणाप्रमाणेच काँग्रेसला राममंदिराचा निर्णय बदलायचा आहे; काय म्हणाले संजय जयस्वाल ?

काँग्रेस (Congress) शतकानुशतके हिंदु धर्म, ब्राह्मण आणि हिंदू देवतांचा अपमान करत आहे. आपल्या व्होट बँकेच्या राजकारणाला बळ देण्यासाठी काँग्रेसला आता राममंदिराबाबतचा (Ram Mandir Ayodhya) सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे. शाहबानो प्रकरणी ज्याप्रमाणे काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय बदलला होता. त्याचप्रमाणे एका विशिष्ट समुदायाला खूश करण्यासाठी काँग्रेस राममंदिराचा निर्णय बदलणार आहे, असे आरोप भाजपाचे नेते आणि एनडीएचे उमेदवार डॉ. संजय जयस्वाल (Sanjay Jaiswal) यांनी केले आहेत.

(हेही वाचा – इंडी आघाडी, मविआला मत म्हणजे लव्ह जिहाद, लँड जिहादला मत; भाजपा आमदार Nitesh Rane यांचा हल्लाबोल)

ते चनपाटिया आणि नौतानमध्ये जनसंपर्क दौऱ्याच्या वेळी बोलत होते. या वेळी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष दीपेंद्र सराफ, युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष धनरंजन कुमार आदी उपस्थित होते.

काँग्रेसला सनातन आणि प्रभु श्रीरामाची अडचण

या वेळी संजय जयस्वाल म्हणाले की, काँग्रेसला सनातन आणि प्रभु श्रीरामाची इतकी अडचण आहे की, त्यांनी प्रभु रामाच्या प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्यावर बहिष्कार टाकला होता. प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्यानंतर राममंदिराला भेट देणाऱ्या किंवा समर्थन करणाऱ्या काँग्रेस नेत्यांचा इतका अपमान झाला की, त्यांना पक्ष सोडावा लागला. सनातनवर बोलणारा काँग्रेसमध्ये रहाणार नाही, हे यावरून सिद्ध होते.

(हेही वाचा – Asaduddin Owaisi : हिजाब घातलेली महिला भारताची पंतप्रधान होईल; असदुद्दीन ओवैसी यांचे आव्हान)

काय म्हणाले आचार्य प्रमोद कृष्णम

आचार्य प्रमोद कृष्णम यांनी राममंदिराचा निर्णय बदलण्यासंदर्भात भाष्य काल केले होते. आचार्य प्रमोद कृष्णम म्हणाले होते की, “मी 32 वर्षांहून अधिक काळ काँग्रेसमध्ये होतो. जेव्हा राममंदिराचा निर्णय आला, तेव्हा राहुल गांधींनी आपल्या जवळच्या सहकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत, ते म्हणाले, काँग्रेसचे सरकार आल्यानंतर एक महासत्ता आयोगाची स्थपना करणार आणि राममंदिराचा निर्णय अगदी तसाच बदलणार, ज्या पद्धतीने राजीव गांधी यांनी शाह बानोचा निर्णय बदलला होता, असा दावाही जयस्वाल (Sanjay Jaiswal) यांनी केला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.