आयकर विभागच्या रडारवर आता अनिल परबांचे निकटवर्तीय!

113

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय यांच्या घरी आयकर विभागाच्या छापेमारीनंतर, आता परिवहन मंत्री अनिल परब यांच्या निकटवर्तीय मानले जाणा-या संजय कदम यांच्या घरी आयकर विभाग धडकलं आहे. संजय कदम हे शिवसेनेच्या अंधेरीच्या पश्चिम मतदारसंघाचे संघटक आहेत. त्यांच्या घरी आयकर विभागाची छापेकरी सुरु आहे.

छापेमारी सुरुच

मंगळवारी संजय राऊत पत्रकार परिषद घेऊन, काही खुलासे करणार असल्याचे ट्वीट करत सांगितले. त्यांची पत्रकार परिषद होण्याआधीच शिवसेना नेत्यांच्या निकटवर्तीयांच्या घरी सकाळीच आयकर विभागाची छापेमारी सुरु झाली आहे. एकीकडे आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय राहुल कनाल यांच्या घरी आयकर विभागाची छापेमारी सुरु आहे. तर दुसरीकडे परिवहन मंत्री अनिल परबांचे निकटवर्तीय मानले जाणा-या संजय कदम यांच्या घरीदेखील आयकर विभागानं धाड टाकली आहे.

( हेही वाचा: इंदुरीकरांचा पुन्हा एकदा सुटला तोल! केलं ‘हे’ वादग्रस्त वक्तव्य )

राजकीय वर्तुळात चर्चा 

शिवसेना उपनेते आणि स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरावर आयकर विभागानं काही दिवसांपूर्वी धाडी टाकल्या होत्या. जवळपास चार दिवस हे धाडसत्र सुरु होतं. अशातच आता ठाकरेंशी संबंधित दोघांच्या घरावर आयकर विभागानं छापेमारी केली आहे. शिवसेना नेते संजय राऊत मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन या तपास यंत्रणांच्या भ्रष्ट्राचार उघड करणार असल्याचं जाहीर केलं, त्यापूर्वीच शिवसेना नेत्यांच्या निकटवर्तीयांच्या घरी छारेमारीला आयकर विभागाने सुरुवात केली आहे. त्यामुळे आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.