सेनेचा ‘संजय’ विरुद्ध भाजपचा ‘संजय’! वाद पोहचला पोलिस ठाण्यात!

सोमवार, १९ एप्रिल रोजी भाजपचे आमदार संजय कुटे हे आमदार संजय गायकवाड यांचा निषेध करण्यासाठी बुलढाण्यात आले. मात्र अज्ञात व्यक्तींनी कुटे यांच्या गाडीवर हल्ला चढवला आणि गाडीच्या काचा फोडल्या.

भाजप आमदार संजय कुटे यांच्या गाडीच्या काचा फोडण्यात आल्याची घटना समोर आली आहे. संजय कुटे यांनी हा हल्ला सेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या समर्थकांनीच केल्याचा आरोप केला आहे. मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते, तर मी ते देंवेंद्र फडणवीसांच्या तोंडातच कोंबून टाकले असते, अशा प्रकारचे वक्तव्य संजय गायकवाड यांनी केले होते. त्यानंतर बुलढाण्यात शिवसेना आणि भाजपमध्ये वाद चांगलाच पेटला होता.

संजय कुटे यांची गाडी फोडली!

दरम्यान सोमवार, १९ एप्रिल रोजी भाजपचे आमदार संजय कुटे हे निषेध करण्यासाठी बुलढाण्यात आले होते. मात्र अज्ञात व्यक्तींनी कुटे यांच्या गाडीवर हल्ला चढवला आणि गाडीच्या काचा फोडल्या. या घटनेनंतर संतप्त झालेले कुटे यांनी पोलिस स्टेशनकडे धाव घेतली. संजय गायकवाड यांच्याच समर्थकांनी आपल्या गाडीच्या काचा फोडल्या असल्याचा आरोप कुटे यांनी केला आहे.

(हेही वाचा : रुग्ण आकडा घसरतो, पण मृत्यूचा आकडा वाढतोय!)

काय म्हणाले कुटे?

माझ्या गाडीवर बुलढाणा येथे संजय गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांनी भ्याड हल्ला केला, आता मी संजय गायकवाड यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल होऊन त्यांना अटक होत नाही, तोपर्यंत मी बुलढाणा शहर सोडणार नाही, मी परत बुलढाणा शहरात येतोय हिम्मत असेल, मला अडवून दाखवावे, असे ट्विट कुटे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here