काँग्रेसच्या (Congress) सदस्यत्वाचा राजीनामा दिलेले संजय निरुपम (Sanjay Nirupam) आता २० वर्षानंतर शिवसेनेत घरवापसी करणार आहेत. आज (३ मे) संजय निरुपम (Sanjay Nirupam) शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट घेतल्यानंतर संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी शिवसेनेत प्रवेश करण्यावर शिक्कामोर्तब केलं आहे. (Sanjay Nirupam)
(हेही वाचा –विखे पाटलांना साथ देणं Vijay Auti यांना भोवलं)
संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर सांगितलं की, पुढे काय करायचं यावर विस्तृत चर्चा झाली. पुढील माहिती तुम्हाला पक्षाकडून भेटेल, अशी माहिती संजय निरुपम यांनी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत भेट आणि चर्चा झाल्यानंतर संजय निरुपम यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना ही माहिती दिली आहे. (Sanjay Nirupam)
(हेही वाचा –राजकारणी, मुत्सद्दी आणि संरक्षण मंत्री V. K. Krishna Menon)
“मी बाळासाहेब भवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बोलावण्यावर त्यांची भेट घेतली. त्यांची भेट घेतल्यावर पुढे काय आणि कसं काम करायचं यावर सविस्तर चर्चा झाली. 3 मे ला दुपारी शिवसेनेत प्रवेश करणार आहे. शिवसेना पक्षात प्रवेश केल्यावर पक्षाच्या सर्व उमेदवारांचा जोरदार प्रचार करणार. शिवसेनेचे सर्व उमेदवार विजयी व्हावेत यासाठी प्रयत्न करणार.” असं संजय निरुपम यांनी सांगितलं आहे. (Sanjay Nirupam)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community