काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आलेले माजी खासदार संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत हे खिचडी घोटाळ्याचे (khichadi ghotala) मुख्य सूत्रधार असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. याशिवाय संजय राऊत (Sanjay Raut) यांचा अटकेची मागणी त्यांनी केली आहे. त्यांच्या कुटुंबियांना या प्रकरणात एक कोटीची दलाली घेतल्याचा आरोपही संजय निरुपम यांनी केला आहे. (Sanjay Nirupam)
संजय राऊत खिचडीचोर
संजय निरुपम (Sanjay Nirupam) म्हणाले, “उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे जे उमेदवार (अमोल कीर्तीकर) आहेत, खिचडीचोर, त्यांना ईडीने चौकशीसाठी बोलवले आहे. चौकशीनंतर ईडी काय करेल मला माहिती नाही, पण खिचडीचोराविरोधात निश्चितपणे कारवाई व्हायला हवी. खिचडी चोर आणि खिचडी घोटाळ्यावर (khichadi ghotala) मी काम सुरू केलं, तेव्हा हे माहिती पडलं की, याचा मुख्य सूत्रधार दुसराच कुणीतरी आहे. खिचडी घोटाळ्याचा जे मुख्य सूत्रधार आहे, ते उबाठा गटाचे संजय राऊत.” असं निरुपम सुरूवातीला म्हणाले. (Sanjay Nirupam)
राऊतांनी मुलगी, भाऊ आणि भागीदाराच्या नावावर घेतले पैसे
पुढे ते म्हणाले “खिचडी घोटाळ्यात (khichadi ghotala) संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या कुटुंबाने एक कोटीची दलाली घेतली. संजय राऊत यांच्या भावाच्या, मुलीच्या नावाने चेकद्वारे रक्कम घेतले. संजय राऊत यांची मुलगी निकिता हिच्या खात्यात 3लाख 50 हजार, 5 लाख, तीन लाख अशी रक्कम जमा झाली. तसेच संदीप राऊत यांच्या खात्यात 5 लाख, 1 लाख 25 हजार रुपये जमा झाले. सुजीत पाटकर यांच्या खात्यात 14 लाख, 14 लाख, 10 लाख, 1 लाख 90 हजार, 1 लाख 90 हजार जमा झाले. जेव्हा ते पत्राचाळ घोटाळ्यात त्यांना पकडलं गेलं, तेव्हा हे आढळून आलं की, त्यांनी आपल्या पत्नीच्या नावे लाच घेतली आहे. बिल्डरकडून पैसे घेतले. यात पत्नीला आणायला नको होतं. आता हा जो घोटाळा केला आहे, त्यात त्यांनी आपली मुलगी, भाऊ आणि त्यांचा जो भागीदार आहे, त्याच्या नावे पैसे घेतले आहेत.” असा आरोप संजय निरुपम यांनी केला आहे. (Sanjay Nirupam)
हे पहा –
Join Our WhatsApp Community