विधानसभेसाठी शिवसेनेची लाडक्या बहिणीवर मदार; असे का म्हणाले Sanjay Nirupam?

102
कॉंग्रेस महिलाविरोधी; भगिनींनो सावध व्हा! Sanjay Nirupam यांचा आरोप
  • प्रतिनिधी

विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी शिवसेनेची लाडक्या बहिणीवर सेनेची मदार आहे. त्यामुळे राज्यात ‘लाडकी बहीण कुटुंब भेट अभियान’ राबविण्यात येणार असून शिवसेनेचे ५० हजार कार्यकर्ते सुमारे १ कोटी महिलांशी प्रत्यक्ष भेटून संवाद साधणार आहेत, अशी माहिती शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी बाळासाहेब भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

(हेही वाचा – Adarsh ​​Teacher Mayor Award : महापालिकेच्यावतीने ‘आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार – सन २०२३-२४’ जाहीर)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते ‘लाडकी बहीण कुटुंब भेट’ अभियानाचा शुभारंभ होईल. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यातील ७० ते ८० विधानसभा मतदारसंघांवर शिवसेनेने लक्ष केंद्रीत केले आहे. प्रत्येक मतदारसंघातील कार्यकर्ता शिंदे यांचे लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, असे हमीपत्र घेऊन १० लाडक्या बहिणींच्या घरी पोहोचेल, असे निरुपम म्हणाले. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून हे अभियान तयार करण्यात आले आहे. बदलापूर घटनेचे राजकारण करणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्यावर निरुपम यांनी कठोर शब्दांत टीका केली. सांगलीत पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचे अनावरण सोहळ्याला विरोधी पक्ष नेते राहुल गांधी येणार आहेत. मात्र याकार्यक्रमाचे शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आमंत्रण देण्यात आलेले नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या षडयंत्राने ठाकरेंना सांगलीतून हद्दपार केले. आता लवकरच ठाकरे महाराष्ट्रातून हद्दपार होतील, अशी टीका निरुपम (Sanjay Nirupam)  यांनी केली. महाविकास आघाडी ही मतभेद विकास आघाडी बनली असून निवडणूक जवळ येताच आघाडी फुटेल, असा दावा निरूपम केला.

(हेही वाचा – Electricity Theft : दादरमधील केशवसुत उड्डाणपूलाखालील गाळ्यांमध्ये पुन्हा वीज चोरी, फेरीवाल्यांमुळे गाळ्यांमध्ये लखलखाट)

असा साधतील संवाद

शिवसेना कार्यकर्ते दर शुक्रवार, शनिवार आणि रविवार या दिवशी लाडक्या बहिणींच्या घरी जातील. दररोज किमान ५ लाख आणि महिनाभरात ६० लाख लाडक्या बहिणींच्या घरी या अभियानातून संपर्क साधला जाईल. या अभियानात सर्वच कार्यकर्त्यांच्या मोबाईलमध्ये विशेष ॲपचा समावेश असेल. या ॲपमध्ये जिओ ट्रॅकिंग असून कार्यकर्त्याने केलेला संपर्क, त्या ठिकाणी दिलेला वेळ, लाडक्या बहिणींचा योजनेबाबतचा अनुभव आणि सूचनांची नोंद केली जाईल. तसेच गरज पडल्यास ॲपमधून नाव नोंदणी देखील केली जाणार आहे. (Sanjay Nirupam)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.