काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांचा शुक्रवार, ३ मे रोजी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे. यासंबंधी निरुपम यांना मुख्यमंत्री शिंदे यांनी भेटायला बोलावले. त्यानंतर निरुपम यांनी आपण मुंबईतील सर्व उमेदवार निवडून आणणार असल्याचे म्हणाले.
काय म्हणाले संजय निरुपम?
आपल्या पक्ष प्रवेशासंदर्भात सविस्तर माहिती ही पक्षाकडून देण्यात येईल. तसेच पक्षात प्रवेश केल्यानंतर पक्षाचे जेवढेही लोकसभेचे उमेदवार आहेत, त्यांच्यासाठी आपण प्रचार करणार असून शिवसेनेचे सर्व उमेदवार निवडून आणण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार आहे, अशी प्रतिक्रिया संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
संजय निरुपम यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर ते शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात होत्या. यावर अखेर शिक्कामोर्तब झाला आहे. संजय निरुपम यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर प्रवेशाबाबत माहिती दिली. तसेच उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून ते लोकसभा निवडणूक लढणार असल्याचे बोलले जात होते. यावर संजय निरुपम (Sanjay Nirupam) म्हणाले, आता निवडणूक कुठे लढणार? नेहमी आपल्या इच्छेप्रमाणे घडत नाही.
Join Our WhatsApp Community