वक्फ विधेयकावरून Sanjay Nirupam यांचा शिवसेना उबाठावर घणाघात

110
वक्फ विधेयकावरून Sanjay Nirupam यांचा शिवसेना उबाठावर घणाघात
  • प्रतिनिधी

वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाला विरोध करणाऱ्या शिवसेना उबाठाच्या भूमिकेवर शिवसेनेचे उपनेते आणि प्रवक्ते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी मंगळवारी तीव्र शब्दात टीका करत, शिवसेना उबाठाची हिंदू समाजातील विश्वासार्हता संपल्याचे ठामपणे सांगितले. मुस्लिम मतांसाठी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी आणि हिंदुत्वाशी गद्दारी करणाऱ्या शिवसेना उबाठाला बाळासाहेबांचे नाव घेण्याचा नैतिक अधिकार नाही, असेही ते म्हणाले. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

“शिवसेना उबाठाची प्रॉपर्टी प्रेमाची हौस आता उघड”

वक्फ सुधारणा विधेयक हे कोणत्याही जाती किंवा धर्माशी संबंधित नसून, देशातील स्थावर मालमत्तेशी संबंधित आहे. वक्फ बोर्डाच्या ताब्यात जवळपास २ लाख कोटी रुपयांच्या मालमत्ता असून, त्या संदर्भात पारदर्शकता आणण्यासाठी हे विधेयक आवश्यक असल्याचे सांगत निरुपम (Sanjay Nirupam) यांनी शिवसेना उबाठाच्या विरोधाला केवळ राजकीय स्वार्थ ठरवले. त्यांनी टोला लगावत म्हटले की, “शिवसेना उबाठाच्या नेत्यांना प्रॉपर्टीमध्ये पहिल्यापासूनच रस आहे, त्यामुळे वक्फच्या जमिनींवरही त्यांचे डोळे होते का, असा प्रश्न उपस्थित होतो.”

(हेही वाचा – Uttar Pradesh पुन्हा हादरले; महाविद्यालयातील शिक्षक मैनुद्दीन अन्सारीने केला हिंदू मुलीवर लैंगिक अत्याचार)

“मुस्लिम मतांसाठी लांगूलचालन”

संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी आरोप केला की, “मुस्लिम संघटनांनी शिवसेना उबाठाला निवडणुकीत फंडिंग केल्यामुळेच आता ते वक्फ विधेयकास धर्माशी संबंधित नसल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत.” शिवसेना उबाठाने न्यायालयातही जाणार नसल्याचे जाहीर केले असून, ही भूमिका मुस्लिम मतांसाठी केलेल्या सौदेबाजीतूनच उद्भवलेली असल्याचे त्यांनी सांगितले.

“वक्फ जमीन म्हणजे भारताची जमीन”

वक्फ बोर्डाकडील मालमत्ता ही भारताचीच आहे आणि जर त्या मालमत्तेचा गैरवापर झाला असेल, घोटाळे झाले असतील, तर सरकारला कारवाई करण्याचा संपूर्ण अधिकार असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.

(हेही वाचा – Majhi Ladki Bahin योजनेचा हप्ता ३० एप्रिलला; अक्षय तृतीयेला बहिणींना मिळणार भेट)

“खुलताबादच्या नामांतरावरून शिवसेना उबाठाचा खोटा आव”

खुलताबादचे पूर्वीचे नाव ‘रत्नपूर’ असल्याचा मुद्दा शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी मांडला आहे. यावर आता शिवसेना उबाठा श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, महाविकास आघाडी सरकारच्या २२ महिन्यांच्या काळात मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी खुलताबादचे नामांतर का नाही केले? असा थेट सवाल संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी केला.

“मतांसाठी केलेली गद्दारी मोलाची ठरेल”

संपूर्ण प्रकरणात शिवसेना उबाठाची दुटप्पी भूमिका स्पष्ट होत असून, “मतांसाठी मुस्लिमांचे लांगूलचालन करणाऱ्या उबाठाला जनतेकडून उत्तर मिळणारच आहे. त्याची मोठी किंमत त्यांना आगामी निवडणुकीत चुकवावी लागेल,” असा इशाराही संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी दिला.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.