Sanjay Rathod Accident: मंत्री संजय राठोड यांच्या गाडीला अपघात; चालक गंभीर

108
Sanjay Rathod Accident: मंत्री संजय राठोड यांच्या गाडीला अपघात; चालक गंभीर
Sanjay Rathod Accident: मंत्री संजय राठोड यांच्या गाडीला अपघात; चालक गंभीर

अन्न आणि औषध प्रशासन मंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांच्या कारला भीषण अपघात (Sanjay Rathod Accident) झाला आहे. पोहरादेवीतून यवतमाळला जात असताना त्यांच्या कारला मध्यरात्री दोन ते अडीचच्या दरम्यान अपघात झाला. त्यांच्या कारनं पिकअपला धडक दिली. या अपघातातून संजय राठोड आणि त्यांचा चालक सुदैवानं बचावले. (Sanjay Rathod Accident)

एअरबॅग्ज वेळीच उघडल्यानं संजय राठोड यांच्या जीव वाचला. या अपघातात पिकअप वाहन उलटून तिचा चालक जखमी झाला. यवतमाळच्या दिग्रस रोडवर ही घटना घडली. अपघाताची तीव्रता इतकी होती की पिकअप जागीच उलटला, आणि अपघातात राठोड यांच्या कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला आहे. (Sanjay Rathod Accident)

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यासाठी संजय राठोड पोहरादेवीला
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या यवतमाळला येणार आहेत. त्यासाठी पोहरादेवीला काल नियोजन बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड या बैठकीला गेले होते. तिथून यवतमाळला परतत असताना संजय राठोड यांच्या कारला कोपरा गावाजवळ अपघात झाला. (Sanjay Rathod Accident)

पिकअपचा चालक गंभीर
अपघातात पिकअपचा चालक गंभीर जखमी झाला आहे. त्याला पालकमंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनानं उपचारासाठी यवतमाळला नेण्यात आलं आहे. पिकअपमधून केळीची वाहतूक सुरु होती. व्यापाऱ्याचं नुकसान टाळण्यासाठी रस्त्यावर पडलेली केळी दुसऱ्या वाहन्यात भरुन पोहरागडला पाठवण्यात आली. कारची पिकअपला धडक बसताच कारमध्ये असलेल्या एअरबॅग्ज उघडल्या. त्यामुळे संजय राठोड आणि त्यांचा चालक थोडक्यात बचावले. त्यांची प्रकृती ठीक आहे. (Sanjay Rathod Accident)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.