देवेंद्र फडणवीस यांच्या “या” निर्णयाचे Sanjay Raut यांच्याकडून स्वागत

115
देवेंद्र फडणवीस यांच्या "या" निर्णयाचे Sanjay Raut यांच्याकडून स्वागत
  • प्रतिनिधी

सचिव पदाच्या गैरवापरावर नियंत्रण ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असेल, तर त्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणे योग्य नाही, असे शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी स्पष्ट केले आहे.

(हेही वाचा – Davis Cup 2025 : टोगोला सरळ सामन्यांत हरवून भारतीय संघ पुन्हा एकदा जागतिक गटात)

“कोणाला सचिव म्हणून बसवायचं, त्याच्या माध्यमातून पैसे गोळा करायचे, असे प्रकार अनेक ठिकाणी घडले आहेत. सचिव अनेक ठिकाणी कलेक्टर असतात, म्हणजे पैसा गोळा करणारे, डील करणारे आणि मंत्र्यांच्यावतीने पैसे स्वीकारणारे. यावर जर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना नियंत्रण आणले असेल, तर त्यावर टीका व्हावी, असे मला वाटत नाही,” असे राऊत (Sanjay Raut) यांनी सांगितले.

(हेही वाचा – पुणे-मुंबईतील आकाशात पहायला मिळाले International Space Station)

राज्यात अनेक वेळा प्रशासकीय अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. अशा परिस्थितीत योग्य निर्णय घेतल्यास त्यावर राजकीय आरोप-प्रत्यारोप होऊ नयेत, असे राऊत यांनी सुचवले. सचिव पदाच्या गैरवापरास आळा घालण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचेही त्यांनी म्हटले. राऊत (Sanjay Raut) यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून, त्यांच्या या भूमिकेचा विविध राजकीय पक्षांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.