Sanjay Raut : ‘राज्यघटनेवर एकप्रकारे बलात्कारच’ राऊत यांचा तोल ढासळू लागला

136
Sanjay Raut : ‘राज्यघटनेवर एकप्रकारे बलात्कारच’ राऊत यांचा तोल ढासळू लागला
Sanjay Raut : ‘राज्यघटनेवर एकप्रकारे बलात्कारच’ राऊत यांचा तोल ढासळू लागला

शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदासाठी कुणीच पाठींबा देत नसल्याने ठाकरे यांच्या उबाठा (UBT) गटाचे ‘सारथी’ प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) बिथरले आहेत. दिवसेंदिवस त्यांचा तोल ढासळू लागला आहे. आज तर राऊत म्हणाले, “शिवसेनेच्या एका खटल्यासंदर्भात तारखांवर तारखा पडत आहेत, हा राज्यघटनेवर एकप्रकारे बलात्कारच आहे,” तसेच “कोर्टही एक माणूस आहे आणि न्यायदेवतासुद्धा एक स्त्री आहे आणि न्यायदेवतेवरही अत्याचार होत आहेत,” अशी बेताल वक्तव्ये राऊत यांच्याकडून होऊ लागली आहेत.

(हेही वाचा- Badlapur School Girl Rape Case: मविआ नेत्यांची दुतोंडी भूमिका उघड करण्यासाठी भाजपाचे आंदोलन)

विविध पातळ्यांवर उबाठा तोंडघशी

एकनाथ शिंदे यांच्यासह काही आमदारांनी बंडखोरी केली असा आरोप करत त्यांना अपात्र करावे, अशी मागणी करणारी शिवसेना उबाठाने केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे, उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांना महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहेरा म्हणून घोषित करावे, अशी याचना केली, पण कॉँग्रेस आणि शरद पवार यांनी ती फेटाळली. बदलापूर प्रकरणात राजकीय फायदा उठवण्यासाठी ‘महाराष्ट्र बंद’ची घोषणा केली आणि मुंबई उच्च न्यायालयाने ‘बंद’लाच बंदी घातली, त्यामुळे ‘बंद’ मागे घेण्याची नामुष्की ओढवली. अशा विविध पातळ्यांवर उबाठा तोंडघशी पडत असल्याने राऊत (Sanjay Raut) यांच्याकडून उद्विग्न भावना व्यक्त होऊ लागल्या आहेत.

कोर्ट माणूस, न्यायदेवता स्त्री

शनिवारी सकाळी राऊत (Sanjay Raut) पत्रकारांशी बोलताना म्हणाले, “ज्या पद्धतीचे राजकारण या महाराष्ट्रात सुरू आहे, इथे कुणीही सुरक्षित नाही. कोर्टाला सुद्धा लेकी-बाळी, मुली, सुना आहेत, हे लक्षात घ्या. कोर्टसुद्धा माणूसच आहे, आणि न्यायदेवतासुद्धा एक स्त्री आहे, आणि या देशात न्यायदेवतेवरसुद्धा अत्याचार होत आहेत, म्हणून आमची लढाई आहे. पण शेवटी कोर्टाने असा निर्णय (‘बंद’वर बंदी) का दिला? आम्ही असं म्हणणार नाही की दबावाखाली दिला. जसं आमच्या शिवसेनेच्या एका खटल्यावर तारखांवर तारखा पडत आहेत, हा सुद्धा राज्यघटनेवर एकप्रकारे बलात्कारच आहे,” असे राऊत म्हणाले.

(हेही वाचा- Badlapur School Case : दोन अल्पवयीन मुलींवर एकदा नाही तर अनेकदा अत्याचार झाल्याची शक्यता, अहवाल काय सांगतो?)

लोकशाही काय कामाची?

पुढे बोलताना राऊत म्हणतात, “पण त्याहीपेक्षा आम्हाला चिंता आहे या राज्यातील मुलींची, बहीणींची, सगळ्यांची. त्यासाठी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. लोकशाहीमध्ये आंदोलनाला फार महत्व आहे. आंदोलनच नसतील, आमचा आवाजच कुणी दाबणार असेल तर लोकशाही काय कामाची.. लोकशाही कुचकामी..” (Sanjay Raut)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.