‘शिवसेनेच्या पंखाखाली राहून आपला स्वाभिमान जपू नये’, राऊतांचा शिंदे गटाला टोला

157

शिवसेनेतून आमदारांचा मोठा गट शिंदे गटात सामील झाल्यावर आता शिंदे गटाकडून थेट शिवसेना पक्षावरच दावा केला जात आहे. सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असले तरी शिवसेना ज्यांनी सोडली त्यांनी अपेक्षा न ठेवता आपला स्वतंत्र संसार मांडा काही आमदारांच्या बंडामुळे पक्षाला काही फरक पडणार नाही असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. सध्या शिवसेनेतून हकालपट्टी केलेल्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती ही शिंदे गटाकडून केली जात आहे. त्यामुळे शिवसेना कोणाची हा निर्णय सर्वोच्च न्यायालयच्या निकालानंतर लागणार आहे.

( हेही वाचा : सहकारी पतसंस्थांमधील ठेवींवर आता मिळणार १० टक्क्यांपर्यंत व्याज )

आपला स्वतंत्र संसार मांडा…

शिवसेना सोडली म्हणाल्यावर आता अपेक्षा न ठेवता आपला स्वतंत्र संसार मांडा. बंडामुळे पक्षाला काही फरक पडणार नाही. शिवसेना-शिवसेना करण्यापेक्षा पक्षाची स्थापना करून मतदारांपुढे जा म्हणजे अस्तित्व लक्षात येईल ही बाळासाहेब यांची खरी शिवसेना आहे आणि भविष्यातही राहिल असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

शिवसेनेच्या पंखाखाली राहून आपला स्वाभिमान जपू नये

स्वाभिमानाचा मुद्दा घेऊन पक्षातील ज्या आमदारांनी बंड केले त्यांना आता स्वाभिमान दाखवून द्यायची संधी आहे. त्यांनी शिवसेनेच्या पंखाखाली राहून आपला स्वाभिमान जपू नये. अनेकांनी पक्ष सोडून शिवसेना नाव घेतल्याशिवाय त्यांचा दिवस उजाडत नाही त्यांना स्वत:चा स्वाभिमान दाखवून देण्यासाठी चांगली संधी आहे असेही राऊत म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.