राऊत आणि राणा लडाखमध्ये; कट्टर विरोधक एकत्र दिसले

132

मागच्या महिन्याभरापासून संजय राऊत आणि राणा दाम्पत्य यांच्यातील संघर्ष महाराष्ट्राने पाहिला आहे. एकमेकांवर आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात होत्या. आता राज्यातील कट्टर विरोधक हे लडाखमध्ये एकत्र दिसले आहेत. एरवी एकमेकांवर टीकेचे बाण सोडणारे संजय राऊत आणि नवनीत राणा हे दोन्ही खासदार संसदेच्या संरक्षण समितीचे सदस्य म्हणून लडाखमध्ये आहेत.

गदारोळानंतर झाली होती अटक

रवी राणा आणि संजय राऊत हे एकत्रित जेवण करताना देखील दिसले. तर काही दृश्यांमध्ये दोघेही गप्पा मारताना दिसत आहेत. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी हनुमान चालिसा मातोश्रीसमोर करण्याचा इशारा दिला होता. यानंतर मोठा गदारोळ झाला होता. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

( हेही वाचा: शेतकरी आंदोलनाची हाक; पुणतंब्याच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय)

राणा आणि राऊत एकत्र दिसल्याने चर्चा रंगल्या

या सगळ्या गदारोळानंतर, खासदार संजय राऊत यांनी नवनीत राणांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप केला होता. जर लकडावालाने मनी लाॅंड्रींग केले आहे आणि त्याचा पैसा अनेक ठिकाणी फिरवला आहे, त्यातले एक लाभार्थी म्हणजे राणा दाम्पत्य. असा आरोप राऊतांकडून करण्यात आला होता. राणा दाम्पत्याने अनेकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरदेखील गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे लडाखमध्ये संजय राऊत आणि राणा दाम्पत्य एकत्र दिसल्याने सध्या चर्चांना उधाण आले आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.