राऊतांच्या अटकेनंतर सामनाच्या अग्रलेखात नेमके काय? राज्यपाल की…? अग्रलेखातून सवाल

80

शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांना अखेर रात्री ईडीने अटक केली. त्यानंतर आज म्हणजे 1 ऑगस्टच्या सामनाच्या अग्रलेखात नेमकी काय भूमिका असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सामनाच्या अग्रलेखातून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. राज्यपाल हे पूर्वाश्रमीचे संघ प्रचारक आहेत. त्याबद्दल वाईट वाटण्याचे कारण नाही, पण राजभवनात बसून सरकार पाडणे, काड्या घालणे, वादग्रस्त वक्तव्ये करणे हे योग्य नाही, असे लेखात म्हटले आहे. कोश्यारी भाजपासाठी मतपेढी तयार करत आहेत, असे सामनातून म्हटले आहे.

सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातून राज्यपाल भाजपसाठी काम करत असल्याचे, म्हटले आहे. राज्यपाल की…? असा सवाल सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आला आहे. घटनात्मक पदावर बसून मुंबई- महाराष्ट्राच्या नागरिकांत जात-प्रांताची भेदाभेदी करणारी विधाने राज्यपाल कोश्यारी करत आहेत. मुंबई- ठाणे काय किंवा महाराष्ट्र काय, मराठी माणसांबरोबर इतर भाषिक व प्रांतिक गुण्यागोविंदाने नांदत आहेत. कोठेही मिठाचा खडा पडलेला नाही. कोविड काळात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री या नात्याने सगळ्यांचाच सांभाळ केला. राज्यपाल मात्र जात- प्रांतात भेदाभेदी करुन महाराष्ट्रात व हिंदुत्वात फूट पाडत आहेत. त्यामुळे कोश्यारी यांना राज्यपाल म्हणायचे की आणखी काही, असा प्रश्न मराठी माणसांना पडला असेल तर तो चुकीचा कसा म्हणता येईल! गुजराती, राजस्थानी, हिंदी भाषिक लोक यांना वेगळे पाडून भाजपसाठी वेगळी मतपेढी करण्याचे काम घटनात्मक पदावरील व्यक्ती करत असेल तर राष्ट्रीय एकात्मकेची ऐशी की तैशी व्हायला वेळ लागणार नाही, असे अग्रलेखात म्हटले आहे.

( हेही वाचा: सकाळी 8 ला वाजणारा भोंगा बंद झाला; मुख्यमंत्र्यांचा संजय राऊतांना टोला )

राजभवन हे भाजप कार्यालय

लोकमान्य टिळकांच्या अटकेनंतर मुंबई बंद पाडली व हाच कष्टकरी वर्ग चले जाव चे नारे देत गांधींच्या मागे उभा राहिला. त्यामुळेच ब्रिटिशांना गाशा गुंडाळावा लागला. राज्यपालांचे विधान श्रीमंत, उद्योगपतींची तळी उचलणारे आहे व शेतकरी- कष्टक-यांचा अपमान करणारे आहे. राज्यपालांनी राजभवनाचे भाजप कार्यालय बनवून ठेवले आहे. अनेक घटनाबाह्य कृतींचे ते केंद्र बनले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.