शिवसेना नेते संजय राऊत यांना ईडीने अटक केल्यानंतर, राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर निशाणा साधताना दिसत आहेत. यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचे, विरोधीपक्षातील नेत्यांचे म्हणणे आहे. तर ज्यांनी भ्रष्टाचार केला आहे, त्यांना शिक्षा होणारच असे भाजपचे म्हणणे आहे. संजय राऊत यांच्यावर झालेल्या ईडी कारवाईविरोधात शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी राज्यसभा अध्यक्षांना पत्र लिहिले आहे. आजच्या सत्रात केंद्रीय यंत्रणांच्या दुरुपयोगावर चर्चा घ्यावी, यासाठी त्यांनी राज्यसभा अध्यक्षांना पत्र लिहिले आहे.
( हेही वाचा: राऊतांना ईडी म्हणजे काय ते आता कळेल; तपासात अनेक प्रकरणे समोर येतील: किरीट सोमय्या )
प्रियांका चतुर्वेदींचे राज्यसभा अध्यक्षांना पत्र
खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी राज्यसभा अध्यक्षांना पत्र लिहिले आहे. आजच्या सत्रात केंद्रीय यंत्रणांच्या दुरुपयोगावर चर्चा घ्यावी यासाठी प्रियांका यांनी पत्र लिहिले आहे. ईडी, सीबीआय, आयटीचा देशात दुरुपयोग होत असल्याचा, आरोप प्रियांका चतुर्वेदी यांनी केला आहे. इतर विषय सस्पेंड करुन यंत्रणांच्या दुरुपयोगावर चर्चा करण्याची मागणी त्यांनी या पत्रातून केली आहे.
Join Our WhatsApp Community