आता संजय राऊतांचे निकटवर्ती सुजित पाटकरांचा स्टॅम्प पेपर घोटाळा

107
उद्धव ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांचे पार्टनर सुजित पाटकर यांनी बोगस डुप्लिकेट स्टॅम्प पेपर वापरून अस्तित्वात नसलेल्या कंपनीच्या नावाने मुंबई महानगरपालिकेकडून १०० कोटींचे कोविड सेंटर कॉन्ट्राक्ट मिळविले, असा गंभीर आरोप भाजप नेते डॉ. किरीट सोमय्या यांनी केला.

एकच स्टॅम्प पेपर अनेकदा वापरला 

सुजित पाटकर यांनी लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस या कंपनीच्या नावाने स्टॅम्प पेपर क्र. AY136973 आणि AY136974 या दोन स्टॅम्प पेपरचा फोर्जरी करून या दोन्ही स्टॅम्प पेपरवर एकदा नाही तर दोनदा पार्टनरशिप डिड चे करार केल्याचे आता मुंबई महापालिका व पोलिसांना आढळले आहे. या फोर्जरी, फ्रौड, चीटिंगची आता मुद्रांक नोंदणी महानिरीक्षक (IGR Stamps) म्हणजे महाराष्ट्र सरकारच्या महसूल खात्याने पण चौकशी सुरु केली आहे. याच स्टॅम्प पेपरवर मुंबई महानगरपालिकेशी करार करण्यात आला, याच स्टॅम्प पेपरचा वापर करून पुणे महानगरपालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) शी पण कोविड सेंटरचा करार करण्यात आला. एकच स्टॅम्प पेपर अनेकवेळा वापरण्यात आल्याचे आता लक्षात आले आहे. या संबंधात आता महाराष्ट्राच्या स्टॅम्प अधिक्षक यांनी ही चौकशी सुरु केली आहे. या संदर्भात लवकरच एफआयआर होण्याची शक्यता आहे, असे भाजपा डॉ. किरीट सोमैया यांनी कळविले आहे.

पोलिसांनी कारवाई करावी 

या सगळ्या करारावर जी नोटरी करण्यात आली आहे ती ही बोगस, फोर्जरी आहे. मुंबई महानगरपालिकेला दिलेल्या पार्टनरशिप डिड वर २० नोव्हेंबर २०१० तारखेला पार्टनरने सह्या केल्या आहेत. तसेच, त्याला राकेश टूडा या परळ येथील नोटरीने प्रमाणित केले आहे, असे सुजित पाटकर यांनी मुंबई महानगरपालिकेला सांगितले. याच स्टॅम्प पेपरवर म्हणजे AY136974 वर त्या भागीदाराच्या सह्या व करार आहे. त्यावर २६ जून २०२० ची सही आहे. हा करार पुणे महानगरपालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण ला देण्यात आले, यावरही परळ येथील नोटरी राकेश टूडा याची सही असल्याचे आढळले. आम्ही या नोटरी संबंधी चौकशी केल्यावर या नोटरीने ह्या तारखेला अश्या प्रकारचे कोणतेही सर्टिफिकेट सही केलेली नाही, कोणताही करार ऑथेन्टिकेट केलेला नाही. सुजित पाटकर यांनी मुंबई महानगरपालिका, पुणे महानगरपालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) ला जे पार्टनरशिप डिड दिले तसेच त्यांच्याबरोबर जो वेगळा जुलै २०२१ मध्ये करार केला व अन्य २१ टेंडर अप्लिकेशन केले त्या सगळ्यांमध्ये ही पार्टनरशिप डिड रजिस्टर आहे असे म्हटले आहे. परंतु, आम्हाला ३० डिसेंबर, २०२१ रोजी निबंधक भागीदारी संस्था, महाराष्ट्र सरकार याने लिखित कळवले कि, सुजित पाटकर यांची लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस कंपनी ही रजिस्टर कंपनी नाही, नोंदणीकृत नाही. महाराष्ट्रात नोंदणीकृत नसलेल्या कोणत्याही भागीदारी फर्म ह्यांच्याशी कुठल्याही सरकारी  संस्थेला करार करता येत नाही, त्यांना कोणतेही काम टेंडर देता येत नाही. ट सोमैया यांनी फेब्रुवारी २०२२ मध्ये आझाद मैदान एस्प्लानेड कोर्ट येथे याचिका दाखल केली. कोर्टाने आझाद मैदान पोलिसांना चौकशी करण्याचे आदेश दिले. मुंबई महापालिकेने यासाठी सह आयुक्त सुनील धामणे यांची मे महिन्यात दोन सदस्यांची समिती नेमली. या समितीने आपला जो अहवाल दिला त्यात सुजित पाटकर लाइफलाईन सर्विसेसने अश्या प्रकारची फोर्जरी, फसवणूक, चीटिंग केली असल्याचे आपल्या अहवालात स्पष्टपणे म्हटले आहे. हा अहवाल आझाद मैदान पोलीस ठाणे व आझाद मैदान न्यायालयात सुपूर्द करण्यात आला असल्याचे किरीट सोमय्या म्हणाले.
महापालिकेच्या अहवालात असे स्पष्टपणे म्हटले आहे की, भागीदारी संस्था २६ जून २०२०  नंतर अस्तित्वात आली. ज्या कंपनीचा जन्म झाला नव्हता, त्याचा काही अनुभव नाही, बँक अकाऊंट नाही, जीएसटी नाही, इन्कमटॅक्स नंबर नाही अशा कंपनीला मुंबई महानगरपालिकेने रु. १०० कोटींचे कोविड सेंटरचे कॉन्ट्राक्ट दिले. अशा बोगस संस्थेला पीएमआरडीए चे अध्यक्ष तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते, त्यांनी शिवाजीनगर जम्बो कोविड सेंटर पुणे यांना कोट्यवधी रुपयांचे कॉन्ट्रॅक्ट दिले, या कंपनीमुळे पुणे येथील शिवाजीनगर जम्बो कोविड सेंटर मध्ये ३ कोविड रुग्णांचा मृत्यू झाला. मुंबई महानगरपालिकेने अशा बोगस संस्थेला कसे काय कॉन्ट्राक्ट दिले, महापालिकेच्या अहवालामध्ये सिद्ध झाल्यानंतरही मुंबई महानगरपालिकेने  या संबंधी कारवाई केली नाही, म्हणून मुंबई पोलिसांनी या अधिकाऱ्यांची चौकशी करावी आणि कारवाई करावी, अशी मागणी किरीट सोमैया यांनी केली.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.