महाराष्ट्र हे लेच्यापेच्यांचं राज्य नाही, 4 मेच्या अल्टीमेटवर संजय राऊतांचे उत्तर

136

1 मे महाराष्ट्र दिनी झालेल्या जाहीर सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यावर पुन्हा एकदा भाष्य केले आहे. राज ठाकरे यांनी आता सरकारला मशिदींवरील भोंगे खाली उतरवण्यासाठी 4 मेचा अल्टीमेटम दिला आहे. आता राज ठाकरेंच्या या अल्टीमेटमवर संजय राऊत यांनी पलटवार केला आहे. महाराष्ट्र हे लेच्यापेच्यांचं राज्य नाही, राज ठाकरेंनी दिलेल्या अल्टीमेटमनंतरही राज्यात परिस्थिती बदलणार नाही. राज्यात लोकनियुक्त सराकार आहे. त्यामुळे काय करायच हे सरकारला माहिती आहे. असा सूचक इशारा राऊत यांनी दिला आहे.

राऊतांनी फडणवीसांना झापले

महाराष्ट्र दिनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बूस्टर सभेत शिवसेनेवर टीकास्त्र डागले. बाबरी पाडली तेव्हा शिवसेनेचा एकही नेता नव्हता, असे म्हणत फडणवीसांनी गौप्यस्फोट केला. त्यावर राऊतांनी फडणवीसांना झापले आहे. सीबीआयने या प्रकरणाचा तपास केला आहे. त्या तपासाची पाने पाहावीत. केंद्रीय गुप्तचर खात्याचा अहवाल तपासावा. ही अज्ञानी लोकं आहेत. त्यांनी जरा इतिहास पाहिला, तर कळेल की शिवसेना कुठे आहे. आता हा विषय काढण्याची गरज काय ? तो विषय संपला आहे. आता तिथे राम मंदिर उभे राहत आहे. प्रश्न बदलले आहेत. मुळ प्रश्न दडवण्यासाठी भाजप आणि त्यांचे नवीन साथीदार गुप्त, छुपे हे सर्व या विषयाकडे आकर्षित करतात, पण लोक आता त्यात पडणार नाहीत, असेही राऊत यावेळी म्हणाले. देवेंद्र फडणवीसांनी रावणाचाही इतिहास पाहावा. तो त्यांच्या अहंकाराने गेला, काही जणांना विरोधी पक्षाच्या अंगात जो रावण संचारलेला आहे. त्यांनी त्याचा अंत करावा.

( हेही वाचा: संपूर्ण भारतावर राज्य करणा-या ‘ईस्ट इंडिया कंपनी’चा मालक एक भारतीय आहे )

लवकरच मुख्यमंत्र्यांची मुलाखत

भोंग्यांवर  बोलणा-यांनी जनतेच्या प्रश्नांवर बोलावे. भोंग्यांशिवाय अनेक महत्त्वाचे विषय आहेत, त्यावर बोलावे. आम्ही सुद्धा भोंग्याच्या या विषयावर काम केले आहे. आमच्या पाठपुराव्यानंतर, सर्वोच्च न्यायालयात भोंग्यावरुन निर्णय घेण्यात आला.  मुख्यमंत्र्यांची लवकरच सामनामध्ये मुलाखत होणार आहे, ती पाहावी असेही राऊत यावेळी म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.