दोन दगडं मारली असतील, तर भाजपाला दु:ख वाटण्याचे कारण काय ? राऊतांनी सोमय्यांवरील हल्ल्याचे केले समर्थन

129

शनिवारी रात्री भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यानंतर सध्या राज्यातील राजकीय वातावरण पेटले आहे. यासंदर्भात शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत, सोमय्यांवर झालेल्या हल्ल्याचे समर्थन केले आहे. आयएनएस विक्रांतचा घोटाळा लोकांना डिस्टर्ब करणारा आहे. लोकांचा पैसा गोळा केला गेला. देशाची आणि जनतेची दिशाभूल केली. अशा व्यक्तीच्या विरोधात जनता रस्त्यावर उतरली असेल, दोन दगडं मारली असतील तर भाजपाला दु:ख वाटण्याचे कारण काय? भाजपनेही अशा गोष्टींचे समर्थन केले आहे, असे म्हणत संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

सध्या सिक्युरिटी घोटाळा सुरु आहे

केंद्र सरकार झेड प्लस, वायप्लस सेक्युरिटी देत आहे. तो सिक्युरिटी घोटाळा आहे. कोर्टात जसा दिलासा घोटाळा सुरु आहे. तसाच, हा घोटाळा आहे. ममता बॅनर्जी आणि आमच्या विरोधात कुणी बोलले, तर त्यांना लगेच संरक्षण दिले जाते. तसा जीआरच काढला आहे, असे वाटते. असा टोलाही राऊतांनी लगावला. आपण न्यायालयाचा विश्वास गमावत आहोत. असे त्यांनी सांगितले. वकिलीची परीक्षा पास झालेले फडणवीस हे गांभीर्य समजून घ्यायला तयार नाहीत. सत्ता गमावल्यामुळे ते त्या मनस्थितीत दिसत नाहीत, अशी टीका त्यांनी केली.

( हेही वाचा: मोठी बातमी! राणा दाम्पत्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी )

आमच्या रक्तातच आक्रमकता

नवनीत राणा, मोहित कंबोज आणि किरीट सोमय्यांवरील हल्ल्यांचे तुम्ही समर्थन करता का? असा सवाल राऊतांना करण्यात आला. त्याचे मी समर्थन करतो. शिवसेना समर्थन करते. कारण बोगस जात प्रमाणपत्र घोटाळ्यातील आरोपी त्यांच्यावर अनेक गुन्हे आहेत. ते आरोपीच आहेत. उच्च न्यायालयाने त्याबाबत निर्णय दिला आहे. मुंबई पोलिसांचा अहवाल आहे. ते आरोपीच आहेत. असे आरोपी जर मातोश्रीवर येऊन हनुमान चालिसा म्हणणार असतील, तर शिवसैनिक आक्रमक होणारच. आमच्या रक्तातच आक्रमकता आहे. असेही त्यांनी स्पष्ट केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.