राज्यपालांचे अधिकार काढून घेणारा कायदा राज्य सरकारने बनवला. आता याच विद्यापीठ कायद्यावरुन पुन्हा एकदा संघर्ष निर्माण झाला आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी विद्यापीठात कुलगुरुंची नियुक्ती करण्यास सुरुवात केल्याने आता वादाला तोंड फुटलं आहे. त्यावरुन प्रतिक्रिया देताना शिवसेना खासदार संजय राऊत यांची पुन्हा एकदा जीभ घसरली आहे. आम्ही संघर्ष करत नाहीत. त्यांना खाजवायची सवय पडली आहे. त्यांची खाज कधी संपेल माहीत नाही. पण एवढी पण खाज बरी नाही, अशा शब्दांत संजय राऊत यांनी राज्यपालांवर टीका केली आहे.
दिल्लीत सर्व एकत्र
महाराष्ट्रातील सर्व पक्षीय खासदार, आमदार संसदीय कामकाजाचा अभ्यास करण्यासाठी नवी दिल्लीत आले आहेत. त्याबाबतही राऊत यांनी भाष्य केले. शिक्षणासाठी किंवा काही गोष्टी शिकण्यासाठी खासदार आणि आमदार दिल्लीत येतात. राज्यातील सर्व पक्षांचे हे खासदार आहेत. आमचे कर्तव्य आहे त्यांच्याशी संवाद साधावा. पक्ष वगैरे महाराष्ट्रात. दिल्लीत आम्ही सर्व एकत्र आहोत.
महाराष्ट्र म्हणून एकत्र असणे आवश्यक
हे सर्व आमदार, खासदार संध्याकाळी येत आहेत सफदरजंग लेनला. निलम गोऱ्हे आणि 80 आमदार, अधिकारी आहेत. त्यानंतर संध्याकाळी रात्री शरद पवारांकडे त्यांच्यासाठी भोजन व्यवस्था आहे. डिनर डिप्लोमसी नाही. जेवण आहे. आम्ही यजमान आहोत त्या सर्वांचे. असे वातावरण खेळीमेळीचे महाराष्ट्राच्या राजकारणात होते आणि ते राहावे असे आम्हाला वाटते. विशेषत: दिल्लीत आम्ही महाराष्ट्र म्हणून एकत्र असायला हवे, असे राऊत म्हणाले.
( हेही वाचा: शिवसेना खासदार मुख्यमंत्र्यांवर नाराज, राऊतांसमोर वाचला तक्रारींचा पाढा! )
उद्धव ठाकरेंसोबत बैठक होईल
सोमवारी शिवसेना पक्षाची बैठक झाली. या बैठकीत खासदारांनी काही भूमिका मांडल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सूचनेने शिवसंवादाच्या निमित्ताने खासदार विदर्भात गेले होते. त्यांनी अहवाल तयार केला आहे. संसदेचे अधिवशेन संपल्यावर उद्धव ठाकरेंसोबत सर्व खासदारांची बैठक होईल. या दौऱ्यात जो अनुभव आला त्यावर आणि संघटनात्मक त्रुटीवर चर्चा केली जाईल. खासदारांच्या काही तक्रारी आहेत असं तुम्ही म्हणता त्यात तथ्य नाही. काही ठिकाणी मजबुतीने काम करावे लागेल हे मात्र खरे आहे. शिवसेनेच्या मंत्र्याबाबत बोलता येणार नाही. आघाडी म्हणून प्रत्येक मंत्र्याचे कर्तव्य आहे. महाविकास आघाडीतील प्रत्येक घटकाचे ऐकले पाहिजे. त्याला मदत केली पाहिजे. इतर पक्षाचा पालकमंत्री असेल तर तो दुसऱ्या पक्षाकडे दुर्लक्ष करतो. या गोष्टी कॉमन असल्याचे राऊत यावेळी म्हणाले.
Join Our WhatsApp Community