श्रीमान पोपटलाल! असे म्हणत ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी ईडीच्या कारवाईवरुन भाजप नेते किरीट सोमय्या यांचे नाव न घेता त्यांना डिवचले आहे. संजय राऊत यांनी आपल्या ट्वीटर हॅंडलवरुन ट्वीट करत किरीट सोमय्या यांच्यासह भाजपवर निशाणा साधला आहे.
काय म्हणाले राऊत ?
खासदार संजय राऊत यांनी आपल्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरुन तुम्हारा सिर्फ वक्त आया है, हमारा दौर आयेगा, असे कॅप्शन लिहिलेला एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ रिट्वीट करत त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, समझने वाले को इशारा काफी है, ईडीची कु-हाड तुमच्यावरच आल्याशिवाय राहणार नाही. श्रीमान पोपटलाल! मार्क माय वर्ड्स, असे ट्वीट राऊत यांनी केले आहे.
( हेही वाचा: आम्ही उद्धव ठाकरेंचा आदर करतो, आदित्य ठाकरे त्याचा गैरफायदा घेतात; दीपक केसरकरांचा हल्लाबोल )
समझने वाले को इशारा
काफी हैं…
Ed ची कुऱ्हाड तुमच्यावरच उलटल्याशिवांय राहणार नाही..
श्रीमान पोपटलाल!
Mark my words.. https://t.co/RVV4aPexcR— Sanjay Raut (@rautsanjay61) March 10, 2023
राऊत यांनी ट्वीट केल्यानंतर त्यांच्या या ट्वीटवरुन नेटक-यांनी त्यांना ट्रोल केले आहे. पाहा काही ट्वीट
आणि ते जे ‘उध्वस्त ठाकरे पुढचे २५ वर्ष मुख्यमंत्री राहणार’ हे मार्क करुन ठेवलं होतं त्याचं काय करायचं ते पण सांगा
— mastermind98 (@Jaannleva) March 10, 2023
ED च्या कुऱ्हाडी चा घाव चांगलाच बसला आहे.. तेंव्हापासूनच अशी वायफळ बडबड चालू आहे😂😂
— Ram (@Ram9699_) March 10, 2023
😃😃 राजीनामा द्या आणि पुन्हा निवडून या. मग बोम्बा मारा रोज ऊठून
— Pritam Kothadiya 🇮🇳 (@KothadiyaSpeaks) March 10, 2023
Join Our WhatsApp Communityजाऊद्या राऊत साहेब, इकडे राजकारणात इतकी मोठी उलथापालथ झाली अणि तुम्ही नुसते प्रेरणादायी कोट्स आणि व्हिडिओ पोस्ट करत राहिले.
— निलेश जाधव (@imNileshJadhav) March 10, 2023